FD पेक्षा जास्त नफा देणारी सरकारची नवी योजना, दर सहा महिन्यांनी होणार फायदा

FD पेक्षा जास्त नफा देणारी सरकारची नवी योजना, दर सहा महिन्यांनी होणार फायदा

01 जुलै 2020 पासून केंद्र सरकारची (Government of India) फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड 2020 (टॅक्‍सेबल) ही योजना गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जुलै : या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून केंद्र सरकारची (Government of India) फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड 2020 (टॅक्‍सेबल) ही योजना गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7.15 टक्के या दराने व्याज मिळेल. या योजनेची विशेष बाब म्हणजे, या योजनेमध्ये मिळणारे व्याज दर सहा महिन्यांनी केंद्र सरकारकडून बदलण्यात येईल. त्याचप्रमाणे एकरकमी व्याज न मिळता सहा-सहा महिन्यांनी गुंतवणूकदारांना व्याज मिळेल. म्हणजे जर आता तुम्ही गुंतवणूक केली तर 1 जानेवारी 2021 रोजी या व्याजदरामध्ये बदल होईल. हे बाँड्स आरबीआय बाँडच्या बदल्यात लाँच करण्यात आले आहेत. आरबीआय बाँड सरकारने मागे घेतले आहेत. त्याचे व्याजदर 7.75 टक्के होते. बाँडच्या पूर्ण कालावधी दरम्यान याच व्याजदराने व्याज दिले जाई. या योजनेबाबत नेहमी विचारण्यात येणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे-

1. सरकारच्या या योजनेमध्ये कशी कराल गुंतवणूक?

-हा बाँड कोणत्याही सरकारी बँकेतून खरेदी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेकडून देखील हा बाँड खरेदी करात येईल. बाँड केवळ इलेक्ट्रिक रुपामध्ये खरेदी करण्याची परवानगी आहे. बाँडची खरेदी केल्यानंतर ते गुंतवणूकदारांच्या बाँड लेजर खात्यामध्ये ट्रान्सफर होतील. रोख रक्कम देऊनही याची खरेदी करता येईल. मात्र त्याची मर्यादा 20 हजार आहे. याव्यतिरिक्त ड्राफ्ट, चेक आणि इलेक्ट्रिक पेमेंट मोडच्या माध्यमातून बाँड खरेदी करता येतील.

2. किती गुंतवणूक करता येईल?

-यामध्ये कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त हजारच्या पटीमध्ये कितीही गुंतवणूक करता येईल.

(हे वाचा-रेल्वेच्या खासगीकरणाची तयारी: सरकारची मोठी घोषणा; 109 मार्गांवर प्रायव्हेट ट्रेन)

3. मी यामध्ये पैसे लावू शकतो का?

- या देशामध्ये राहणारा कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. त्याचप्रमाणे ज्‍वाइंट होल्डिंगसह आणि एचयूएफ यामध्ये गुंतवणूक करू शकतो. मात्र एनआरआयना हे बाँड खरेदी करण्याची परवानगी नाही आहे.

4. या योजनेत व्याज कधी मिळेल?

-जारी करण्यात आल्यानंतर या बाँड्सचा अवधी 7 वर्षांचा असतो. खास श्रेणीच्या वरिष्ठ नागरिकांना प्रीमॅच्यूर रिडम्पशनची परवानगी आहे. नावावरूनच स्पष्ट होते की, हा बाँड फ्लोटिंग रेट देतो. दर सहा महिन्यांनी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी या बाँडच्या व्याजदरात बदल होईल. व्याजाच्या एकरकमी देयाचा पर्याय उपस्थित होता. याचा अर्थ असा की ज्यादिवशी व्याजाच्या रकमेचे देय असेल, त्यादिवशी ती रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल.

(हे वाचा-महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याने गाठला रेकॉर्ड, चांदी प्रति किलो 50 हजारांवर)

5. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना करात सूट मिळेल का?

-हा टॅक्स सेव्हिंग बाँड नाही आहे. त्यामुळे या बाँडवर मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागेल. तुम्ही ज्या इनकम टॅक्स स्लॅबमध्ये येता त्यानुसार तुम्हाला कर द्यावा लागेल. त्याचप्रमाणे यावर टीडीएस देखील लागू होईल

संपादन - जान्हवी भाटकर

First published: July 2, 2020, 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading