Home /News /money /

SBI खातेधारकांना मिळणार 2 लाखांचा फायदा; काय करावं लागले?

SBI खातेधारकांना मिळणार 2 लाखांचा फायदा; काय करावं लागले?

ज्या ग्राहकांनी बँकेत प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खाते उघडले आहे त्यांना SBI 2 लाख रुपयांचा मोफत विमा देत आहे. सध्या, 28 ऑगस्ट 2018 पूर्वी खाते उघडलेल्या ग्राहकांना विम्याचा लाभ उपलब्ध आहे.

    मुंबई, 8 डिसेंबर : आपल्याला सरकारी योजनांची माहिती असते परंतु योजनांचे छुपे फायदे फार कमी लोकांना माहिती आहेत. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, एका विशिष्ट खात्यावर 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा फायदे देखील देत आहे. ज्या ग्राहकांनी बँकेत प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खाते उघडले आहे त्यांना SBI 2 लाख रुपयांचा मोफत विमा देत आहे. सध्या, 28 ऑगस्ट 2018 पूर्वी खाते उघडलेल्या ग्राहकांना विम्याचा लाभ उपलब्ध आहे. तसेच, ज्यांनी RuPay PMJDY कार्डसाठी अर्ज केला आहे त्यांना विमा संरक्षण मिळत आहे. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत ज्या ग्राहकांचे PMJDY खाते उघडले आहे त्यांना RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतचा विमा आणि त्यानंतर RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती कव्हर दिला जात आहे. Nykaa च्या शेअरमध्ये घसरण होण्याची शक्यता, काय आहे कारण? फायदा कसा मिळवायचा? पीएम जन धन योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामधील खातेदाराला अपघाती विमा मिळतो. याचा लाभ घेण्यासाठी, अपघात विमा लाभ खातेदाराच्या नॉमिनीला व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रासह एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मसोबत अपघाताची एफआयआर प्रत, शवविच्छेदन अहवाल आणि मृत व्यक्तीच्या आधार कार्डची प्रत सादर करावी लागणार आहे. अपघाताच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत दावा (Insurance Claim) जमा करणे आवश्यक असेल तरच जन धन खात्यातील अपघात विम्याचा लाभ मिळेल. नॉमिनीचे नाव बँकेच्या तपशीलासह, पासबुकची प्रत सादर करावी लागेल. तुमच्या खिशातली 500 रुपयांची 'ती' नोट खोटी आहे? तथ्य जाणून घ्या जन धन खात्याचे फायदे >> ठेवींवर व्याज मिळते >> एक लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण. >> सहा महिन्यांनी ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाईल. >> कोणतीही किमान शिल्लक ठेव ठेवण्याची गरज नाही. >> सामान्य अटींवर लाभार्थीच्या मृत्यूवर 30,000 रुपयांचा जीवन विमा देय असेल. >> कुटुंबातील महिलेसाठी केवळ एका खात्यात 5000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Insurance, Pradhan mantri jan dhan yojana, SBI

    पुढील बातम्या