मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Nykaa च्या शेअरमध्ये घसरण होण्याची शक्यता, काय आहे कारण?

Nykaa च्या शेअरमध्ये घसरण होण्याची शक्यता, काय आहे कारण?

Nykaa चा स्टॉक, जो 10 नोव्हेंबर 2021 रोजी NSE वर लिस्ट झाला होता, जवळजवळ 80 टक्के प्रीमियमसह 2018 रुपयांवर उघडला. 26 नोव्हेंबरला शेअर 2573 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होता.

Nykaa चा स्टॉक, जो 10 नोव्हेंबर 2021 रोजी NSE वर लिस्ट झाला होता, जवळजवळ 80 टक्के प्रीमियमसह 2018 रुपयांवर उघडला. 26 नोव्हेंबरला शेअर 2573 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होता.

Nykaa चा स्टॉक, जो 10 नोव्हेंबर 2021 रोजी NSE वर लिस्ट झाला होता, जवळजवळ 80 टक्के प्रीमियमसह 2018 रुपयांवर उघडला. 26 नोव्हेंबरला शेअर 2573 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 8 डिसेंबर : Nykaa च्या IPO ने गुंतवणूकदारांना (Nykaa Investors) चांगला परतावा दिला. केवळ Nykaa ​​नाही तर गेल्या महिन्यात उघडलेले जवळपास सर्वच आयपीओनी चांगला परतावा दिला. गेल्या काही दिवसांपासून बाजारातील घसरणीमुळे नव्याने दाखल झालेल्या सर्व शेअर्समध्येही विक्री (Profit Bopking) दिसून आली. त्यात आता Nykaa विषयी एक महत्‍त्‍वाची माहिती जी गुंतवणूकदारांना माहिती असणे खूप महत्‍त्‍वाचे आहे. या स्टॉकच्या अँकर-गुंतवणूकदारांसाठी (Anchor Investors) अनिवार्य लॉक-इन कालावधी (lock in period) आज म्हणजेच बुधवारी संपला आहे. लॉक-इन संपल्यानंतर, आता अँकर-गुंतवणूकदार हा स्टॉक विकू शकतात आणि तसे झाल्यास हा स्टॉक काही प्रमाणात खाली येणे स्वाभाविक आहे.

Nykaa चा स्टॉक, जो 10 नोव्हेंबर 2021 रोजी NSE वर लिस्ट झाला होता, जवळजवळ 80 टक्के प्रीमियमसह 2018 रुपयांवर उघडला. 26 नोव्हेंबरला शेअर 2573 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होता. त्यानंतर शेअरमध्ये घसरण दिसून आली. बुधवारीही कालच्या पातळीपेक्षा खूपच खाली शेअर उघडला, पण बाजारभावानुसार चांगली खरेदी झाली. बुधवारी शेअर 2049 रुपयांवर उघडला आणि 2182 रुपयांच्या पुढे बंद झाला.

Edelweiss Alternative Research च्या अहवालानुसार, नोव्हेंबरमध्ये 10 IPO नी 36,000 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आणि आता अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉक-इन कालावधी 8 डिसेंबरपासून सुरू होईल.

तुमच्या खिशातली 500 रुपयांची 'ती' नोट खोटी आहे? तथ्य जाणून घ्या

मागील IPO चा अंदाज घेतला तर लिस्ट कंपन्यांना अँकर लॉक-इन कालावधी संपल्यानंतर विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला आहे. उदाहरणार्थ, यावर्षी आतापर्यंत अँकर लॉक-इन कालावधी उघडलेल्या 76 टक्के IPO मध्ये अँकर लॉक-इन संपल्यानंतर विक्रीचा दबाव दिसून आला. अहवालानुसार, IRFC, Indigo Paints, Home First Finance, MTAR Tech, Easy Trip Planners आणि Craftsman Automation या शेअरर्समध्ये सरासरी 2.6 टक्क्यांची घसरण झाली. तसेच अँकर उघडण्याच्या तारखेपासून पाच दिवसांनंतर, 61 टक्के इश्यू सरासरी 3.9 टक्क्यांनी घसरले होते.

यापैकी, लॉक-इन उघडण्याच्या दिवशी Easy Trip Planner आणि Zomato मध्ये अनुक्रमे 10 टक्के आणि 9 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. Clean Science and Tech, Devyani International, Amy Organics आणि इतर स्टॉक्समध्ये सुमारे 4 ते 5 टक्क्यांनी घसरण झाली होती.

दोन हजाराच्या नोटा बाजारात कमी का झाल्या? अखेर खरं कारण समोर

Nykaa च्या स्टॉकचे काय होईल?

इतर IPO च्या रेकॉर्डमुळे गुंतवणुकदारांमध्ये चिंता वाढली आहे की जेव्हा अँकर लॉक-इन उघडेल तेव्हा अलीकडे लिस्ट केलेले स्टॉक्स कसे काम करतील. या महिन्यात पहिला स्टॉक ज्यामध्ये अँकर लॉक-इन उघडत आहे तो Nykaa आहे. Nykaa मध्ये अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉक-इन कालावधी 8 डिसेंबर रोजी संपला आहे. Edelweiss च्या अहवालानुसार, Nykaa मधील अँकर गुंतवणूकदारांकडे एकूण जारी शेअर्सपैकी सुमारे 4.5 टक्के समभाग आहे.

किरकोळ परिणाम होण्याची शक्यता

First Water Capital Fund (AIF) चे लीड स्पॉन्सर रिकी क्रिपलानी यांना विश्वास आहे की लॉक-इन उघडल्यामुळे Nykaa च्या स्टॉकवर परिणाम किरकोळ होईल. ते म्हणाले की, याचे कारण असे आहे की बहुतेक गुंतवणूकदारांनी याकडे त्या उद्योगात एन्ट्री म्हणून पाहिले आहे. कंपनीकडे त्यांचा दीर्घकालीन दृष्टिकोन आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या बाजूने गुंतवणूक कमी होण्याची किंवा विकण्याची शक्यता कमी असते.

दुसर्‍या तज्ञाने सांगितले की अँकर गुंतवणूकदार नेहमी लॉक-इन केल्यानंतर लगेच बाहेर पडत नाहीत, जेणेकरून स्टॉकवर अचानक दबाव येत नाही. जरी त्यांनी तसे केले तरी ते इतर गुंतवणूकदारांना स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची एक आकर्षक संधी मिळते.

First published:

Tags: Investment, Money, Share market