मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आजपासून SBI विकत आहे स्वस्त प्रॉपर्टी, खरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी

आजपासून SBI विकत आहे स्वस्त प्रॉपर्टी, खरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या SBI (State Bank Of India) काही मालमत्तेचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहे. आजपासून ही संधी तुम्हाला मिळणार आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या SBI (State Bank Of India) काही मालमत्तेचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहे. आजपासून ही संधी तुम्हाला मिळणार आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या SBI (State Bank Of India) काही मालमत्तेचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहे. आजपासून ही संधी तुम्हाला मिळणार आहे.

  नवी दिल्ली, 30 डिसेंबर: घर किंवा एखादी प्रॉपर्टी घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. अशावेळी तुम्हाला देखील हे  स्वप्न पूर्ण करायचे असेल तर ती संधी एसबीआय देत आहे.तुम्ही एखादे घर किंवा स्वस्त प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या SBI  (State Bank Of India) काही मालमत्तेचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहे. यामध्ये रेसिडेंन्शिअल, कमर्शिअल आणि इंडस्ट्रियल याप्रकराच्या मालमत्तांचा समावेश आहे. तेव्हा तुम्ही यावेळी कमी पैशांमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ही ती  प्रॉपर्टी आहे जी डिफॉल्टच्या लिस्टमध्ये आली आहे. डिफॉल्ट प्रॉपर्टीचा होतो लिलाव एखाद्या प्रॉपर्टीसाठी घेण्यात आलेलं कर्ज फेडलं नाही किंवा कोणत्याही कारणामुळे तर ती रक्कम बँकेला दिली नाही तर त्या सर्व लोकांची जमीन बँकेद्वारे ताब्यात घेतली जाते. एसबीआयकडून या प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. या लिलावातून बँक ती प्रॉपर्टी विकून संपूर्ण रक्कम वसूल करते. हे वाचा-...तर प्रत्येकाला मिळू शकते कोरोना लस; कसं ते वाचा सविस्तर तुम्हाला देखील या लिलावात सहभागी व्हायचे असेल तर लक्षात घ्या खालील बाबी -SBI ने या लिलावातून डिफॉल्ट प्रॉपर्टीच्या माध्यमातून थकबाकी वसूल करणार आहे. बँकेने सोशल मीडिया हँडल - फेसबुक, ट्विटरवर  याबाबत जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. -लिलावातील रक्कम बाजार मुल्यापेक्षा कमी असेल. यावेळी प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांना निवासी, व्यवसायिक आणि औद्योगिक मालमत्ता खरेदी करण्याची संधी असेल. -शिवाय प्रापर्टीकरता EMD आवश्यक असेल. -KYC संबंधित सर्व कागदपत्र शाखेमध्ये जमा करावी लागतील. -वैध डिजिटल सिग्नेचर: बोली लावणारे ग्राहक डिजिटल सिग्नेचर मिळवण्यासाठी ई-लिलाव करणाऱ्या किंवा अन्य अधिकृत एजन्सीशी संपर्क करू शकतात. -जेव्हा बोली लावणारे ग्राहक ईएमडी आणि केवायसी कागदपत्रांना संबंधित शाखेत जमा करतील, त्यानंतर रजिस्टर्ड लॉग इन आयडी आणि पासवर्ड ई-लिलाव करणाऱ्यांना ईमेलच्या माध्यमातून पाठवला जाईल. -लिलावाच्या नियमानुसार, बोली लावणाऱ्यांना लिलावाच्या तारखेदरम्यान लॉगइन आणि त्यांच्या निविद्याची आवश्यकता असेल. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी  तुम्ही या लिंकवर व्हिजिट करू शकता -bankeauctions.com/Sbi; -sbi.auctiontiger.net/EPROC/; -ibapi.in; and -mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp.  
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: SBI

  पुढील बातम्या