Home /News /money /

कोरोना काळात बँकेत जाण्याची नाही आवश्यकता, SBI सह या बँकांच्या विविध सुविधा मिळतील ATM मध्येच

कोरोना काळात बँकेत जाण्याची नाही आवश्यकता, SBI सह या बँकांच्या विविध सुविधा मिळतील ATM मध्येच

तुम्ही आतापर्यंतचा एटीएम मशीनचा (ATM) वापर पैसे काढण्यासाठी किंवा बँक अकाऊंटमधील (Bank Account) बॅलन्स तपासण्यासाठीच केला असेल. मात्र, एटीएमचा वापर करून तुम्ही बँकेच्या आणखी बऱ्याच सर्व्हिसेसचा लाभ घेऊ शकता.

नवी दिल्ली, 27 एप्रिल: तुम्ही आतापर्यंतचा एटीएम मशीनचा (ATM) वापर पैसे काढण्यासाठी किंवा बँक अकाऊंटमधील (Bank Account) बॅलन्स तपासण्यासाठीच केला असेल. मात्र, एटीएमचा वापर करून तुम्ही बँकेच्या आणखी बऱ्याच सर्व्हिसेसचा लाभ घेऊ शकता. एटीएम ही खूप कामाची गोष्ट आहे. म्हणजे आधी पैसे काढण्यासाठी बँकेच्या लांब रांगेत उभं राहावं लागायचं. मात्र, एटीएमचा वापर वाढल्यापासून तुम्ही अगदी काही मिनिटांत अकाउंटमधून पैसे काढू शकता. अशीच काही बँकेशी संबंधित कामं तुम्ही एटीएमच्या माध्यमातून पूर्ण करू शकता, जाणून घ्या काय आहेत एटीएमचे आणखी फायदे. 1.पॉलिसीचे प्रीमियम एटीएमचा वापर करून भरा एटीएमचा वापर करून तुम्ही इन्शुरन्स (विमा) पॉलिसीचे (Insurance Policy) प्रीमिअम भरू शकता. बँकांनी यासाठी LIC, HDFC लाइफ आणि SBI लाइफ यासारख्या विमा कंपन्यांशी करार केला आहे. या तिन्ही कंपन्यांचे ग्राहक एटीएमच्या माध्यमातून प्रिमिअम भरू शकतात. एटीएम स्क्रीनवर बिल पे सेक्शनमध्ये जाऊन विमा कंपनीचे नाव सिलेक्ट करा, पॉलिसी नंबर टाका, यानंतर तुमचा वाढदिवस आणि मोबाईलनंबर टाकून एंटर करा. प्रीमिअमची भरायची असलेली रक्कम टाकून कन्फर्म करा. तुमच्या इन्शुरन्सचा प्रीमिअम जमा होऊन जाईल. 2. एटीएममधून लोनसाठी अप्लाय करा एटीएममधून तुम्ही लोनसाठी अप्लाय करू शकता. आयसीआयसीय आणि एचडीएफसी बँक एटीएममधून तुम्ही लोनसाठी अप्लाय करू शकता. (हे वाचा-PPF Scheme:रोज 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील 15 लाख,जाणून घ्या काय आहे योजना) 3. कॅश ट्रान्सफर करा ATM च्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्यातून दुसऱ्यांच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर (money transfer) करू शकता. दिवसातून तुम्ही कितीही वेळा ट्रांझॅक्शन करू शकता. 4. कॅश डिपॉझिट करा - देशातील जवळपास सर्वच बँकांनी एटीएमसोबतच कॅश डिपॉझिट (cash deposit) मशीन बसवली आहेत. या मशीनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा करू शकता. 5.  विविध प्रकारची बिलं भरण्यासाठी वापर फोनचं बिल, वीज बिल, गॅस तसंच इतर बिलं तुम्ही एटीएममधून भरू शकता. बिल भरण्यापूर्वी तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. (हे वाचा-PNB च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ALERT! या कॉल्समुळे होऊ शकतं तुमचं खातं रिकामं) 6.मोबाईल रीचार्ज तुम्ही तुमच्या जवळच्या एटीएममध्ये जाऊन प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज करू शकता. 7. चेक बुक अर्ज तुम्हाला चेक बुक पाहिजे असल्यास बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही जवळच्या एटीएममध्ये जाऊन नव्या चेकबुकसाठी अर्ज करू शकता. त्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही एटीएम केंद्रात गेलात तर या सेवांपैकी ज्या सेवेची गरज आहे ती वापरून पहाच.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: ATM, Corona, Coronavirus, Covid-19, Money, Saving bank account, SBI

पुढील बातम्या