नवी दिल्ली,27 एप्रिल: गेल्या काही काळापासून ऑनलाइन फ्रॉडच्या घटना वाढल्या आहेत. यापासून वाचण्यासाठी ग्राहकांनी अलर्ट राहणं आवश्यक आहे. देशातील विविध बँका याविषयी त्यांच्या ग्राहकांना सूचना देत असतात. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या खातेधारकांना सर्व योजना आणि नियम यांची माहिती देत असते. डिजीटल पेमेंटमुळे ऑनलाइन फ्रॉडचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे डिजीटल पेमेंट करत असताना व्यवस्थित माहिती घ्यावी अशी सुचना दिली आहे. फसवणुकीची प्रकरणंही झपाट्याने वाढत आहेत. ट्वीटद्वारे बँकेने लोकांना याविषयी माहिती दिली आहे. यापूर्वी, भारत सरकारने सामान्य लोक आणि संस्थांना यांना मोठ्या सायबर हल्ल्याच्या शक्यतेबद्दल अलर्ट केलं आहे. डिजीटल व्यवहार करताना सावध रहा. आपल्या व्यवहारांची माहिती मिळवून फसवणूक करण्यासाठी अनेक फ्रॉड लोक तयार आहेत. त्यामुळे सतर्क रहा, फसवणूक करणारे फोन कॉल आणि एसएमएस यांच्या भूलथापांवर विश्वास ठेऊ नका यासंदर्भात PNB बँकेने ट्विटवर माहिती दिली आहे. PNB बँकेने केलेल्या ट्वीटमध्ये एक फोटोही दिला आहे. आपला पिन नंबर, सीव्हीव्ही नंबर, ओटीपी आणि एटीएम नंबर कोणा बरोबरही शेअर करु नका. असं केल्यास आपली फसवणूक होऊ शकते. पैसे ट्रान्सफर करताना नेमके कोणाला पैसे ट्रान्फर करत आहात त्याचे व्हेरिफीकेशन करा. वेगवेगळ्या मार्गांनी फ्रॉड लोक ग्राहकांना चुना लावत आहेत.
धोखाधड़ी करने वालों के पास आपको गुमराह करने के कई तरीके मौजूद हैं।
— Punjab National Bank (@pnbindia) April 26, 2021
इसलिए हमेशा सतर्क रहें और फर्जी फोन कॉल एवं SMS के झांसे में न आएं। pic.twitter.com/4BqPuNqH4F
या गोष्टी लक्षात ठेवा तुमचं कार्ड कोणालाही देऊ नका, कार्ड स्वाईप करना सावधान रहा. तुमचा पिन नंबर कोणालाही देऊ नक. बिल भरल्यानंतर डेबिट कार्ड चेक करा. शॉपिंग केल्यावर बिल घ्यायला विसरु नका. बिल आणि अकाऊटमधून डिडक्ट झालेले पैसे चेक करा. कार्ड स्वाईप केल्यावर त्याची कॉपी घ्यायला विसरु नका. अशाप्रकारे बँक कार्ड फ्रॉड टाळा 1. OTP, PIN, CVV, UPI PIN शेअर करु नका. 2. फोनमध्ये बँक खात्यासंदर्भात कोणतीही माहिती फोनमध्ये सेव्ह करु नका. 3. ATM कार्ड किंवा डेबिट कार्ड यांती माहिती कुणाबरोबरही शेअर करु नका. 4. बॅक आपल्या कार्डसंदर्भात कोणतीही माहिती मागत नाही. 5. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करु नका. 6. अनोळखी लिंकवर क्लीक करु नका. 7. स्पायवेअरचा धोका ओळखा.