Home /News /money /

SBI ग्राहकांसाठी मोठी घोषणा! घरबसल्या मिळेल या 8 सुविधांचा फायदा

SBI ग्राहकांसाठी मोठी घोषणा! घरबसल्या मिळेल या 8 सुविधांचा फायदा

एसबीआय इंटरनेट बँकिंग सुविधा तुम्हाला तुमच्या घरून सुरक्षित बँकिंग व्यवहार करण्याची मुभा देते. तुम्ही यातून केव्हाही व्यवहार करू शकता.

    नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)च्या ग्राहकांना अनेक सुविधा बँकिंग पोर्टलवर मिळत आहेत. या सुविधेमध्ये एसबीआय ग्राहक त्यांच्या खात्यामध्ये किती रक्कम आहे हे तपासू शकता, फंड ट्रान्सफर करू शकता, नवीन चेकबुकसाठी रिक्वेस्ट करू शकता आणि त्याचप्रमाणे डेबिट कार्डसाठी अर्ज देखील करू शकता. या सुविधांव्यतिरिक्त देखील एसबीआय (SBI) ग्राहकांना  इंटरनेट बँकिंग (Internet Banking)च्या माध्यमातून फिक्स्ड डिपॉझिट आणि आवर्ती ठेव खाते तयार करण्याची सुविधा देखील आहे. इंटरनेट बँकिंग वापरण्यासाठी युजरनेम आणि लॉगिन पासवर्ड आवश्यक आहे. एसबीआय इंटरनेट बँकिंग सुविधा तुम्हाला तुमच्या घरून सुरक्षित बँकिंग व्यवहार करण्याची मुभा देते. तुम्ही यातून केव्हाही व्यवहार करू शकता. घरबसल्या करू शकता ही 8 कामे एसबीआयने त्यांच्या ट्वीटरच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की, घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही 8 कामे पूर्ण करू शकता -पैशांचे विविध व्यवहार -एटीएम कार्डसाठी अर्ज करणे (हे वाचा-विदेशी बाजारातील तेजीनंतरही भारतात सोने उतरण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण) -डिपॉझिट खात्यासंबंधातील कामे -बिलपेमेंट -बचत बँक खात्यांचे स्टेटमेंट -चेकबुकसाठी अप्लाय करणे -यूपीआय सुरू आणि बंद करणे -टॅक्स पेमेंट अशाप्रकारे सुरू करा इंटरनेट बँकिंग यापूर्वी खातेदारांना नेटबँकिंग सुविधेसाठी शाखेत जावे लागत असे. आणि एक फॉर्म भरावा लागत असे. त्यानंतर सूविधा सुरू होण्यापूर्वी प्रि-प्रिंट केलेल्या सूचना किटसाठी थांबावे लागत असे. मात्र आता एसबीआय शाखेत जाण्यास वेळ नसल्यास, आता तुम्ही एसबीआयच्या नेटबँकिंग सुविधेसाठी घरातून नोंदणी करू शकता. हे काम पूर्णपणे ऑनलाइन करता येते. वाचा कसे- -एसबीआय नेटबँकिंगचे होमपेज onlinesbi.com वर जा -यानंतर New User Registration/Activation वर क्लिक करा (हे वाचा-मोठी बातमी! डिसेंबर 2017 आधी विकलेल्या वाहनांसाठी देखील FASTag अनिवार्य) -खाते क्रमांक, CIF नंबर, ब्रांच कोड, देश, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि इतर आवश्यक माहिती टाकून सबमिट बटणवर क्लिक करा -यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड क्रमांकावर एक ओटीपी येईल -यानंतर एटीएमकार्ड सिलेक्ट करा, जर तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल तर पुढील प्रक्रिया बँक पूर्ण करेल -टेम्पररी युजरनेम नोट करा आणि लॉग इन पासवर्ड बनवा (पासवर्डमध्ये आठ अक्षरे आणि स्पेशल वर्ड्सचा वापर करा). याठिकाणी पुन्हा एकदा पासवर्ड टाका आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सबमिटवर क्लिक करा -टेम्पररी युजरनेम आणि पासवर्डने लॉग इन करा -यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे युजरनेम बनवू शकता. -नियम व अटी स्वीकार केल्यानंतर लॉग इन पासवर्ड आणि प्रोफाइल पासवर्ड सेट करा. त्यानंतर काही प्रश्न निवडा आणि उत्तर सेट करा -जन्म तारीख, जन्म स्थान आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका -बँक खात्याची माहिती पाहण्यासाठी अकाउंट समरीवर क्लिक करा - आपण "View only right" वर नोंदणीकृत असल्यास आपल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेच्या प्रिंटआउटसह आपला "Transcation right" सक्रिय करण्यासाठी आपल्या शाखेशी संपर्क साधा.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: SBI, Sbi online banking

    पुढील बातम्या