Home /News /money /

विदेशी बाजारातील तेजीनंतरही भारतात सोने उतरण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण

विदेशी बाजारातील तेजीनंतरही भारतात सोने उतरण्याची शक्यता, वाचा काय आहे कारण

डॉलर इंडेक्समध्ये मजबुती आल्यामुळे गुरुवारी विदेशी बाजारात सोनेचांदीच्या किंमती (Gold Silver Rate Live) कमी झाल्या होत्या. मात्र शुक्रवारी सकाळी शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे सोनेचांदीमध्ये काही प्रमाणात तेजी पाहायला मिळाली.

    नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : डॉलर इंडेक्समध्ये मजबुती आल्यामुळे गुरुवारी विदेशी बाजारात सोनेचांदीच्या किंमती (Gold Silver Rate Live) कमी झाल्या होत्या. मात्र शुक्रवारी सकाळी शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे सोनेचांदीमध्ये काही प्रमाणात तेजी पाहायला मिळाली. तर देशांतर्गत वायदे बाजारात म्हणजे एमसीए्क्सवर भारतीय रुपया (Indian Rupee)घसरल्यामुळे सोनेचांदी स्थीर किंमतीवर बंद झाले आहेत. शुक्रवारी सोन्याचांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सुरुवातीच्या सत्रामध्ये ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 0.3 टक्क्यांनी वाढली असून दर 50,911 प्रति तोळावर पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे चांदीचा वायदा दर 0.23 टक्क्यांनी वाढून 67,080 प्रति किलोग्राम  झाला आहे. आज पुन्हा उतरू शकतात सोन्याचे दर तज्ज्ञांच्या मते भारतीय रुपयाचे मुल्य वधारत असल्यामुळे सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा कमी होऊ शकतात. गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 52,529 रुपये प्रति तोळावरून 51,755 रुपयांवर आले आहेत. या दरम्यान 774 रुपये प्रति तोळाची घसरण झाली आहे. (हे वाचा-फसवणूक रोखण्यासाठी SBIची आता नवीन ATMसेवा, ग्राहकांना होणार फायदा) त्याचप्रमाणे चांदीच्या किंमती देखी 1908 रुपये प्रति किलोने कमी झाल्या होत्या. गुरुवारी चांदीचे भाव 71,084 रुपयांवरून कमी होत 69,176 रुपये प्रति किलो झाले होते. (हे वाचा-मोठी बातमी! डिसेंबर 2017 आधी विकलेल्या वाहनांसाठी देखील FASTag अनिवार्य) आता पुढे काय? पृथ्वी फिनमार्ट प्रायवेट लिमिटेड (Prithvi Finmart Pvt Ltd) चे डायरेक्टर (कमोडिटी अँड करनसी) मनोज कुमार जैन (Manoj Kumar Jain)यांच्या मते अमेरिकन शेअर बाजारात, जोरदार विक्रीमुळे डॉलर निर्देशांक कमी होऊ शकेल. ते म्हणतात की डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळे सोन्या-चांदीला सपोर्ट मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या