मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI मध्ये खातं असेल तर आता CIF नंबर ठरणार महत्त्वाचा; काय आहे हे प्रकरण

SBI मध्ये खातं असेल तर आता CIF नंबर ठरणार महत्त्वाचा; काय आहे हे प्रकरण

SBI सगळ्यांना CIF नंबर देत आहे. या क्रमांकाशीच खात्याचे सर्व व्यवहार आता जोडलेले असतात. कुठे दिसेल हा क्रमांक आणि नसेल तर कसा मिळवायचा?

SBI सगळ्यांना CIF नंबर देत आहे. या क्रमांकाशीच खात्याचे सर्व व्यवहार आता जोडलेले असतात. कुठे दिसेल हा क्रमांक आणि नसेल तर कसा मिळवायचा?

SBI सगळ्यांना CIF नंबर देत आहे. या क्रमांकाशीच खात्याचे सर्व व्यवहार आता जोडलेले असतात. कुठे दिसेल हा क्रमांक आणि नसेल तर कसा मिळवायचा?

नवी दिल्ली, 24 मे: बँकेत खातं उघडणं ही अत्यावश्यक बाब आहे. बँकिंग यंत्रणेपासून दूर असलेल्या गरिबांनाही त्यात सामावून घेण्यासाठी जनधन योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे बँकिंग यंत्रणेत समाविष्ट झालेल्या नागरिकांची संख्या वाढली. बँकेत (Bank) खातं उघडल्यावर आपल्याला खातं क्रमांक मिळतो. शिवाय पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी बँकेचा आयएफएससी कोड (IFSC), मायकर (MICR) कोड वगैरे अनेक प्रकारचे क्रमांकही मिळतात. त्यासोबत आणखी एक महत्त्वाचा क्रमांक असतो तो म्हणजे कस्टमर आयडी अर्थात ग्राहक क्रमांक.

सर्व बँकांच्या प्रत्येक ग्राहकाला हा युनिक क्रमांक मिळतो. या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात, की या एका नंबरवर ग्राहकाची सगळी माहिती साठवलेली असते. बँकेच्या सिस्टीममध्ये हा नंबर टाकला, की त्यात ग्राहकाची सगळी माहिती मिळते. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI मध्ये या क्रमांकाला Customer Information File Number अर्थात CIF असं म्हणतात. हा नंबर 11 आकडी असतो. ICICI बँक, HDFC बँक, बँक ऑफ बडोदा अशा अन्य काही बँकांमध्ये या क्रमांकाला कस्टमर आयडी (Customer ID) असं म्हटलं जातं. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

खातं उघडलेल्या प्रत्येक ग्राहकाला हा क्रमांक दिला जातो. हा क्रमांक इंटरनेट बँकिंगसह अन्य अनेक कामांकरिता आवश्यक असतो. त्यामुळे ग्राहकांना आपल्या खात्याचा हा क्रमांक माहिती असणं गरजेचं असतं.

1 रुपयाच्या नाण्याच्या बदल्यात मिळतील 1 लाख रुपये; तुमच्याकडे आहे का हे नाणं?

स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, CIF क्रमांक ग्राहकाच्या पासबुकवर (Passbook) लिहिलेला असतो. पासबुकच्या अकाउंट डिटेल्सच्या पेजवर हा क्रमांक दिलेला असतो. तिथे हा क्रमांक सापडला नाही, तर बँकेच्या शाखेत जाऊन आपला अकाउंट नंबर देऊन CIF नंबर मिळवता येऊ शकतो.

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, नेटबँकिंग आणि योनो अॅपद्वारेही CIF नंबर मिळवता येऊ शकतो.

नेटबँकिंग युझर्सनी सुरुवातीला SBIच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करावं. 'अकाउंट समरी'मध्ये 'नॉमिनी अँड पॅन डिटेल' यावर क्लिक करावं. त्यात CIF नंबरही दिसेल.

SBI आणि बँक बडोदा ग्राहकांना घरबसल्या देत आहेत 'या' सुविधा

त्याशिवाय नेटबँकिंगमध्ये (Netbanking) लॉगिन केल्यावर 'माय अकाउंट अँड प्रोफाइल' यामध्ये जाऊन 'सिलेक्ट युवर सेग्मेंट' यावर क्लिक करावं. त्यातही CIF नंबर दिसेल, असं SBIने म्हटलं आहे.

SBI च्या YONO App मध्ये लॉगिन केल्यानंतर 'सर्व्हिसेस'मध्ये जावं. त्यानंतर 'ऑनलाइन नॉमिनेशन'वर क्लिक करावं. त्यानंतर एक नवा स्क्रीन ओपन होईल. त्यात 'अकाउंट टाइप'मध्ये 'ट्रान्झॅक्शन अकाउंट' निवडावं. त्यानंतर आपला खाते क्रमांक निवडावा. त्यात CIF नंबर दिसेल.

First published:

Tags: SBI, Sbi account