मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता घरबसल्या फोनवरून करू शकतात सर्व कामे; जाणून घ्या कुठल्या सेवेसाठी कुठला नंबर

आता घरबसल्या फोनवरून करू शकतात सर्व कामे; जाणून घ्या कुठल्या सेवेसाठी कुठला नंबर

बॅंक शाखेत कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकाच्या आधारे घरातूनच बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

बॅंक शाखेत कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकाच्या आधारे घरातूनच बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

बॅंक शाखेत कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकाच्या आधारे घरातूनच बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

    नवी दिल्ली, 23 मे: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार, डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञ नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे नागरिक घरी राहूनच जितकी शक्य होतील तितकी कामे पूर्ण करीत आहेत. अशा परिस्थितीत देशातील सर्वच सरकारी बॅंका (Government Bank) आपल्या ग्राहकांना होम बॅकींगची सुविधा देत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या बघता बॅंक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) आपल्या ग्राहकांसाठी एक फोन क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. तसेच भारतीय स्टेट बॅंकेने (State Bank Of India) ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस (Contactless) सुविधा सुरु केली आहे.

    बॅंकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही

    बॅंक शाखेत कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकाच्या आधारे घरातूनच बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतात. यामुळे अर्थिक कामांसाठी ग्राहकांना बॅंक शाखेत जाण्याची गरज भासणार नाही.

    जाणून घेऊया कोणत्या सेवेसाठी कोणता संपर्क क्रमांक आहे

    - अकाऊंट बॅलन्स (Account Balance) जाणून घेण्यासाठी 8468001111 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.

    -शेवटच्या 5 दिवसांतील खात्यावरील जमा-वजावटीची माहिती घेण्यासाठी 8468001122 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.

    -टोलफ्रीक्रमांक – 18002584455/18001024455

    - व्हॉटसअप बँकिंग सेवेसाठी – 8433888777.

    SBI च्या या सूचनांकडे दूर्लक्ष करू नका! अन्यथा येईल कंगाल होण्याची वेळ

    व्हॉटसअपवर मिळणाऱ्या बँकिंग सुविधा

    बॅंक ऑफ बडोदाने व्हॉटसअप बँकिंग सुविधेत बॅलन्स, धनादेश, डेबिट कार्ड ब्लॉक करणे, मिनी स्टेटमेंट, बॅकिंग उत्पादनांविषयी माहिती जाणून घेणे, चेक बुकची मागणी नोंदवणे, चेक स्टेटस, व्याज दर आणि सुविधा यांचा समावेश केला आहे. बॅंकेच्या या व्हॉटसअप बँकिंगचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनीआपल्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये बॅंकेचा 8433888777 हा व्हॉटसअप क्रमांक सेव्ह करावा.

    एसबीआयने जारी केलेले संपर्क क्रमांक

    एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. याबाबत एसबीआयने एक ट्विट केले असून, घरी रहा सुरक्षित रहा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. एसबीआय आपल्या ग्राहकांना संपर्करहित सुविधा देत आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांच्या बॅकींगच्या अनुषंगाने गरजा तत्काळ पूर्ण केल्या जातील. आमचे टोल फ्री क्रमांक 1800112211 किंवा 18004253800 हे असल्याचे नमूद केले आहेत.

    फोनव्दारे मिळणार या सुविधा

    एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या क्रमांकावर ग्राहकांनी कॉल केल्यानंतर त्यांना अकाऊंट बॅलन्स, शेवटच्या 5 ट्रान्झॅक्शन, एटीएम कार्ड चालू किंवा बंद करणे, एटीएम पीन किंवा ग्रीन पीन जनरेट (Pin Generate) करणे, नव्या एटीएम कार्डसाठी अर्ज करणे या सुविधा देण्यात येतील. देशभरात एसबीआयची ग्राहक संख्या 44 कोटी आहे.

    First published:

    Tags: Personal banking, SBI