नवी दिल्ली, 9 जानेवारी : आर्थिक मंदी सोसत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने एक अनोखी योजना आणली आहे. या योजनेनुसार घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना जर ठरलेल्या वेळेत घराचं पझेशन मिळालं नाही तर बँक ग्राहकांना पूर्ण रक्कम परत देईल. जोपर्यंत बिल्डरचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत ही रिफंड योजना मान्य असेल. या लोकांना होणार फायदा या योजनेत जास्तीत जास्त अडीच कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी गृहकर्ज मिळू शकतं. यामध्ये बँकेच्या अटी पाळणाऱ्या बिल्डरांना 50 कोटी रुपयांपासून ते 400 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज मिळेल. SBI चे चेअरमन रजनीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा घर खरेदी करणाऱ्यांना लाभ मिळेल. ज्यांना घराचं पझेशन लवकर न मिळाल्याने आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यांच्यासाठी ही फायदेशीर योजना आहे. खूशखबर! लग्नसराईमध्ये सोन्याचे भाव घसरले, काल गाठला होता उच्चांक रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अॅक्ट (RERA)आणि वस्तू सेवा कराच्या (GST) नियमांनुसार, घर खरेदी करणाऱ्यांना वेळेवर घर देण्यासाठी आणि त्यांची फसवणूक टाळण्यासाठी हा चांगला उपाय आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात SBI ने मुंबईच्या सनटेक डेव्हलपर्सशी 3 प्रकल्पांसाठी करार केला आहे. हे प्रकल्प मुंबई महानगराच्या भागात बनतील. असं होईल काम एखाद्या घर खरेदीदाराने 2 कोटी रुपयांचा फ्लॅट बुक केला असेल, त्यातले 1 कोटी रुपये भरले असतील आणि प्रकल्प रखडला तर 1 कोटी रुपयांचा रिफंड दिला जाईल.आतापर्यंत जे रिअल इस्टेट प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत ते पूर्ण करण्यासाठी सरकारने 25 हजार कोटी रुपयांचा अल्टरनेटिव्ह इनव्हेस्टमेंट फंड (AIF)बनवला आहे. पैसे मिळवण्याचा सोपा फंडा,या माणसाला Twitterवर फॉलो करा आणि मिळवा लाखो रुपये ========================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







