मुंबई, 9 जानेवारी : सोन्याच्या भावात आज जोरदार घसरण झालीय. एकाच दिवसात सोन्याचे भाव 1400 रुपयांनी घसरलेत. सोन्याचा भाव आज 40 हजार 400 रुपये प्रतितोळा झालाय. काल सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. सोन्याचा भाव बुधवारी41 हजार 600 रुपये प्रतितोळा होता. अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे गेल्या 3 दिवसांत सोनं 10 ग्रॅमला तब्बल 2200 रुपयांनी महागलं होतं. सोन्याचे भाव अजून वाढतील, असेही संकेत दिले जात होते पण एका रात्रीत सोन्याच्या भावात जोरदार घसरण झाली. सोन्याचं बिल आवश्यक सोन्याची खरेदी करताना बिल अवश्य घ्या. इनकम टॅक्स रिटर्न भरताना या बिलाच्या मदतीने तुम्ही सोन्याचा सोर्स जाणून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही दाखल केलेल्या इनकम टॅक्स रिटर्न्सची तपासणी होते तेव्हा बिलाचा फायदा होऊ शकतो. वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली पण आता मात्र सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवाळीच्या दिवसात ही चांगलीच सुवर्णसंधी आहे. (हेही वाचा : पैसे मिळवण्याचा सोपा फंडा,या माणसाला Twitterवर फॉलो करा आणि मिळवा लाखो रुपये) हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात. सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी. ========================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







