मुंबई, 29 ऑगस्ट : आर्थिक मंदी दूर करण्यासाठी मागणी आणि पुरवठा वाढवण्यावर भर देण्याचा सरकार विचार करतंय. याचसाठी बँकांनीही स्वस्त कर्ज द्यायला सुरुवात केली आहे. SBI ने सणासुदीच्या दिवसात घर, वाहन खरेदी, शिक्षण या कारणांसाठी स्वस्त कर्ज देण्याची योजना आणली आहे. SBI सोबतच दुसऱ्या बँकाही अशा योजना आणू शकतात. 1 सप्टेंबरपासून ग्राहकांना बँकांच्या या योजनांचा फायदा होणार आहे. यामध्ये प्रोसेसिंग फी मध्ये सवलत, ऑनलाइन कर्जासाठीच्या सुविधांचा समावेश आहे. कारच्या कर्जामध्ये व्याजदरात वाढ केली जाणार नाही. बदललेल्या रेपो रेटनुसार व्याजदरही ग्राहकांच्या फायद्याचे ठरतील. **1.**कार खरेदी : योनो अॅपमध्ये वाढीव सवलत SBI च्या योनो अॅपच्या माध्यमातून कारसाठी कर्ज घेतलं तर त्यावर 0.25 टक्के सूट आहे. 2. घरासाठी कर्ज रिझर्व्ह बँकेने बदललेल्या रेपो रेटनंतर घरासाठी स्वस्त कर्ज देण्याचीही बँकेची योजना आहे. खाजगी संभाषण ऐकणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कंपनीने टाकलं काढून **3.शिक्षणासाठी कर्ज शिक्षणासाठी SBI चं दीड कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज मिळेल. या कर्जाच्या परतफेडीची मुदत 15 वर्षं असेल. त्यामुळे ग्राहकांवर भार पडणार नाही.याचा व्याजदर 8.25 टक्के असेल. **4.**पर्सनल लोन 20 लाख रुपयांपर्यंतच्या पर्सनल लोनसाठी 10.75 टक्के व्याज असेल. हे कर्ज फेडण्याची मुदत 6 वर्षांची असेल. **5.**59 मिनिटांत कर्ज एक तासात होमलोन आणि ऑटोलोन देण्याची योजना SBI ने आणली आहे. पाकिस्तानात हाहाकार! इथले सोन्याचे भाव पाहून तुमचे डोळे होतील पांढरे =========================================================================================== SPECIAL REPORT : सीएमचे ‘पीए’ होणार MLA? शिवसेना सोडेल का जागा?
**