खाजगी संभाषण ऐकणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कंपनीने टाकलं काढून

Parle G, मारुती यानंतर आता जगातली सगळ्यात मोठी कंपनी असलेल्या 'अ‍ॅपल' नेही नोकरकपात केली आहे. पण या नोकरकपातीचं कारण मात्र वेगळं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 05:28 PM IST

खाजगी संभाषण ऐकणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कंपनीने टाकलं काढून

मुंबई, 29 ऑगस्ट : Parle G, मारुती यानंतर आता जगातली सगळ्यात मोठी कंपनी असलेल्या 'अ‍ॅपल' नेही नोकरकपात केली आहे. पण या नोकरकपातीचं कारण मात्र वेगळं आहे. ही नोकरकपात प्रायव्हसी च्या कारणामुळे झाली आहे. युरोपमध्ये शेकडो लोकांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं. सिरी (Siri)रेकॉर्डिंगमध्ये काही गडबड झाली तर ती रोखण्यासाठी या लोकांना कॉन्ट्रॅक्टवर रुजू करून घेतलं होतं.

अ‍ॅपलने या महिन्याच्या सुरुवातीलाच Siri बंद करण्याची घोषणा केली आहे. हे तंत्रज्ञान बंद झाल्यामुळे या लोकांचीही नोकरी गेली.

द गार्डियनमधल्या बातमीनुसार, याआधी, कंपनी कॉन्ट्रॅक्टवरच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे रेकॉर्डिंग ऐकत होती. आता मात्र युझर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन ऑडिओ क्लिप ऐकणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांना कंपनीने घरचा रस्ता दाखवला. हे कर्मचारी एका शिफ्टमध्ये 1 हजार ऑडियो क्लिप्स ऐकत होते.

एअर इंडियाचं होणार खाजगीकरण, सरकारने केली विकण्याची तयारी

या कर्मचाऱ्यांना अ‍ॅपलने 2 ऑगस्टपासून पेड लिव्हवर पाठवलं होतं. त्याच दिवशी कंपनीने Siri बंद करण्याची घोषणा केली होती.

Loading...

ग्राहकांची प्रायव्हसी जपण्यावर चर्चा

अ‍ॅमेझॉनची व्हर्च्युअल असिस्टंट अ‍ॅलेक्सा आणि गुगल असिस्टंट युझर्सच्या वैयक्तिक गोष्टी ऐकत असल्याची बातमी आली आणि एकच गदारोळ झाला. त्याचवेळी अ‍ॅपलच्या Siri वरूनही वाद झाला. अ‍ॅपल आपल्या कर्मचाऱ्यांना युझर्सच्या खाजगी गोष्टी ऐकण्यासाठी पैसे देतं, असा दावा अ‍ॅपलच्याच एका कॉन्ट्रॅक्टरने केला होता. या कॉन्ट्रॅक्टवरच्या कर्मचाऱ्यांनी अ‍ॅपल युझर्सच्या बेडरूममधल्या गोष्टीही ऐकल्या,असंही म्हटलं जात होतं.

या वादावर पडदा टाकण्यासाठी अ‍ॅपलने या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आणि Siri बंद करण्याची घोषणा केली.

=================================================================================================

पुण्यात जागा 8 अन् मुलाखतीसाठी पोहोचल्या 3 निष्ठावंत जोड्या, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...