पाकिस्तानात हाहाकार! इथे सोन्याची किंमत पाहून तुमचे डोळे होतील पांढरे

भारतात सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. सणासुदीच्या दिवसात एवढं महागलेलं सोनं घ्यायचं कसं असा प्रश्न सगळ्यांना सतावतो आहे. पण पाकिस्तानमधल्या सोन्याची किंमत पाहून तुमचे डोळे पांढरे होतील.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 03:49 PM IST

पाकिस्तानात हाहाकार! इथे सोन्याची किंमत पाहून तुमचे डोळे होतील पांढरे

इस्लामाबाद, 29 ऑगस्ट : भारतात सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. सणासुदीच्या दिवसात एवढं महागलेलं सोनं घ्यायचं कसं असा प्रश्न सगळ्यांना सतावतो आहे. पण पाकिस्तानमधल्या सोन्याची किंमत पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार एका तोळ्याची किंमत 90 हजार रुपये झाली आहे. मागच्या एक महिन्यात इथे सोनं 12 हजार 840 रुपयांनी वाढलं आहे. भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 39 हजार 970 रुपये आहे. म्हणजेच पाकिस्तानात सोन्याची किंमत भारताच्या दुप्पट आहे.

1 लाखांपर्यंत जाऊ शकतो भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढल्यामुळे पाकिस्तानातही हे भाव वाढले आहेत. सोन्याचे भाव असेच वाढत राहिले तर इथे सोन्याचा भाव 1 लाखापर्यंत जाऊ शकतो.

पाकिस्तानात दैनंदिन गरजा भागवणंच कठीण झालं आहे. तिथे सोनं खरेदी करणं तर दूरच राहिलं. पाकिस्तानात डबघाईला आलेली आर्थिक स्थिती पाहता इथली परदेशी गुंतवणूकही येत नाहीये.

हतबल इम्रान खान

Loading...

सोन्याचे एवढे भाव वाढल्यामुळे सराफा बाजारात मंदी आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिक पाकिस्तान सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्याच्या तयारीत आहेत.

पाकिस्तानमध्ये महागाईच्या झळा वाढतच चालल्या आहेत. अशा स्थितीत इथे व्हेनेझुएला किंवा झिम्बाब्वेसारखी परिस्थिती ओढवू शकते, अशी चिंता अर्थतज्ज्ञांना लागली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या स्थितीत असहाय्य आहेत.

SBI ATM चे नियम बदलणार, ATM PIN सोबत हा नंबरही गरजेचा

=================================================================================================

VIDEO : ‘फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या’, राष्ट्रवादी सोडलेल्या साताऱ्याच्या नेत्यांना अमोल कोल्हेंचा बोचरा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...