नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India - SBI) गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी फेस्टिव्ह ऑफर्सची सुरुवात केली आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना परवडणारे होम लोन घेता यावे, हे या ऑफर्समागदे उद्दिष्ट आहे. एसबीआयने होम लोनवरील व्याजदर कमी केला आहे. यासह SBI ने 6.70 टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देण्याची ऑफर आणली आहे. यामध्ये कर्जाची रक्कम कितीही असू शकते.
याआधी 75 लाखांपेक्षा जास्त लोनवर 7.15 टक्के दराने पेमेंट करावे लागत असे. फेस्टिव्ह ऑफर्सना सुरुवात झाल्यानंतर आता कमीतकमी 6.70 टक्के दराने कर्ज मिळवतील. या ऑफरमुळे 45bps ची सेव्हिंग होईल. एकूण मिळून 75 लाखाचे कर्ज 30 वर्षांसाठी घेतले असेल तर जवळपास 8 लाख रुपयांपेक्षा जास्तीची बचत होईल.
हे वाचा-पेन्शनधारकांसाठी खूशखबर! SBI च्या सेवेअंतर्गत घरबसल्या मिळतील सुविधा
एसबीआयने पगारदार आणि वेतन नसलेल्या गृहकर्ज कर्जदारांमधील फरक दूर केला आहे. आतापर्यंत, वेतन नसलेल्या कर्जदारांसाठी व्याज दर पगार वर्ग कर्जदारांपेक्षा 15bps जास्त होता. सणासुदीच्या काळात बाजार सेंटिमेंटना चालना देण्यासाठी बँकेने प्रोसेसिंग फीस (processing fees) देखील पूर्णपणे माफ केली आहे. बँकेने कर्जदारांच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित व्याजदरात सवलत दिली आहे.
हे वाचा-Gold Price Today: स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, 9358 रुपयांनी कमी आहेत दर
एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक सीएस शेट्टी (C.S. Setty)म्हणाले की, गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी ही फेस्टिव्ह ऑफर सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. साधारणपणे, सवलतीचे व्याज दर निश्चित मर्यादेच्या कर्जासाठी लागू असतात आणि ते कर्जदाराच्या व्यवसायाशी जोडलेले असतात. या वेळी आम्ही ऑफर सुलभ केली आहे आणि कर्जदारांच्या व्यवसायाची पर्वा न करता लोकांच्या सर्व घटकांना लक्षात घेऊन कर्ज प्रदान केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI, Sbi alert, SBI bank, Sbi bank job