• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, 9358 रुपयांनी कमी आहेत दर

Gold Price Today: स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी, 9358 रुपयांनी कमी आहेत दर

Gold price today: सोन्याच्या किंमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे दर 0.17 टक्के दराने कमी झाले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: सोन्याच्या किंमतीत  (Gold Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) सोन्याचे दर 0.17 टक्के दराने कमी झाले आहेत. तर चांदीच्या किंमतीत (Silver price today) तेजी पाहायला मिळते आहे. आज चांदीचे दर 0.20 टक्के दराने वाढले आहेत. या वाढीनंत़र चांदी 63,421 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. 9,358 रुपये स्वस्त मिळत आहे सोनं गेल्यावर्षी एमसीएक्सवर ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आज एमसीएक्सवर सोन्याचे दर 46,815 रुपये प्रति तोळा आहे. त्यानुसार आज सोन्याचे दर  9,358 रुपये प्रति तोळाने स्वस्त आहेत. हे वाचा-Air India चं खासगीकरण अखेरच्या टप्प्यात! Tata बरोबर याही कंपनीने लावली बोली सोन्याचांदीचे दर  (Gold Silver Price) दरम्यान ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत आज  46,815 रुपये प्रति तोळा आहे. सोन्याचे दर आज 0.17 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर चांदीचे दर 0.20 टक्क्यांनी वाढून 63,421 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही  www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. हे वाचा-दूरसंचार क्षेत्रात 100 % FDI ला परवानगी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: