मुंबई, 15 ऑगस्ट : रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बँकांनी आपले व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा कर्ज महाग केले आहे. SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) 20 बेस पॉईंटने वाढवण्याची घोषणा केली आहे. SBI चे नवीन दर आज 15 ऑगस्ट 2022 पासून लागू झाले आहेत. 5 ऑगस्ट 2022 रोजी, RBI ने सलग तिसर्यांदा रेपो दर वाढवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर खाजगी क्षेत्राकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कर्जे महाग केली आहेत. SBI ने MCLR वाढवल्यानंतर गृहकर्ज, कार लोन, एज्युकेशन लोन आणि पर्सनल लोनसह अनेक प्रकारची कर्जे आता महाग होणार आहेत. तसेच बँकेच्या ग्राहकांचे EMI देखील वाढणार आहे. MCLR किती वाढला? SBI ने 15 ऑगस्ट 2022 पासून MCLR 7.15 टक्क्यांवरून 7.35 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, जो ओव्हरनाईट ते तीन महिन्यांसाठी लागू आहे. त्यामुळे 6 महिन्यांचा MCLR दर 7.45 टक्क्यांवरून 7.65 टक्के करण्यात आला आहे. एका वर्षासाठी MCLR 7.50 टक्क्यांवरून 7.70 टक्के आणि दोन वर्षांसाठी 7.7 वरून 7.9 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.8 वरून 8 टक्के करण्यात आला आहे. SBI ने गेल्या महिन्यात MCLR मध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. टाटा समूहाच्या ‘या’ शेअरमुळे काही गुंतवणूकदार मालामाल तर काहींचं मोठं नुकसान, वर्षभरात नेमकं काय घडलं? रेपो दरात वाढ झाल्याचा परिणाम गेल्या तीन महिन्यात आरबीआयने तीन टप्प्यात रेपो दरात 1.40 टक्के वाढ केली आहे, त्यानंतर रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. त्यामुळे बँकांना आरबीआयकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. म्हणून आता बँका ग्राहकांवर बोजा टाकत आहेत. होम लोन महाग झाल्यावर ग्राहकांना कर्जाचा कालावधी वाढवाव की EMI? तज्ज्ञांच्या मते काय योग्य?
MCLR म्हणजे काय?
सध्या सर्व फ्लोटिंग रेट कर्ज MCLR किंवा एक्सटर्नल बेंचमार्क कर्ज दराशी जोडलेले आहेत. MCLR एप्रिल 2016 मध्ये अस्तित्वात आला. आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता व्यावसायिक बँका बेसिस दराऐवजी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) च्या आधारावर कर्ज देतात. MCLR हा बँक कर्जाचा बेंचमार्क आहे. याच्या वाढीमुळे कर्जाचा व्याजदर वाढतो. यामध्ये घट झाल्यास कर्जाचा दर कमी होतो.