मराठी बातम्या /बातम्या /मनी /

टाटा समूहाच्या 'या' शेअरमुळे काही गुंतवणूकदार मालामाल तर काहींचं मोठं नुकसान, वर्षभरात नेमकं काय घडलं?

टाटा समूहाच्या 'या' शेअरमुळे काही गुंतवणूकदार मालामाल तर काहींचं मोठं नुकसान, वर्षभरात नेमकं काय घडलं?

Automotive Stampings and Assemblies Ltd कंपनीच्या शेअरमुळे  केवळ 5 महिन्यांत गुंतवणूकदारांना यातून 20 पट परतावा मिळाला. मात्र त्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे.

Automotive Stampings and Assemblies Ltd कंपनीच्या शेअरमुळे केवळ 5 महिन्यांत गुंतवणूकदारांना यातून 20 पट परतावा मिळाला. मात्र त्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे.

Automotive Stampings and Assemblies Ltd कंपनीच्या शेअरमुळे केवळ 5 महिन्यांत गुंतवणूकदारांना यातून 20 पट परतावा मिळाला. मात्र त्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 15 ऑगस्ट : शेअर बाजाराच्या हालचालींचा अंदाज प्रत्येक गुंतवणूकदाराला येत नाही. अशा स्थितीत बहुतांश गुंतवणूकदार तज्ज्ञांच्या मताच्या आधारेच गुंतवणूक करतात. कधीकधी तज्ञांचा सल्ला तुम्हाला चांगला परतावा देतो. असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांत टाटा समूहाच्या एका शेअरसोबत घडला आहे. देशात आणि जगात वेगळी ओळख असलेल्या टाटा समूहावर गुंतवणूकदारांचाही मोठा विश्वास आहे. टाटा समूहाच्या कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत चांगला परतावा दिला आहे. टाटा समूहाचा एक शेअर असा आहे की, केवळ 5 महिन्यांत गुंतवणूकदारांना यातून 20 पट परतावा मिळाला. मात्र त्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. तुम्ही कदाचित या कंपनीबद्दल ऐकले नसेल. 'ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली लि.' असे या कंपनीचे आहे. Automotive Stampings and Assemblies Ltd च्या शेअर्सनी एका वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. ASAL चा स्टॉक एक वर्षापूर्वी 1 ऑगस्ट रोजी 47.95 रुपये होता. यानंतर स्टॉकने तेजी पकडली तर 11 जानेवारी 2022 रोजी तो 925.45 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच, साडेपाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या प्रवासात, स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे 2000% परतावा दिला होता. या स्टॉकची उच्च पातळी होती आणि मात्र शेअर या किंमतीवर फार काळ टिकू शकला नाही. शेअर 413.75 रुपयांवर या स्टॉकमध्ये त्यांनतर प्रचंड घसरण झाली आणि 10 फेब्रुवारी 2022 रोजी तो 425.75 रुपयांपर्यंत घसरला. मात्र, त्यानंतरही या शेअरमध्ये चढ-उतारांची मालिका सुरूच आहे. एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात हा स्टॉक पुन्हा एकदा 700 रुपयांच्या पुढे गेला. त्यानंतर पुन्हा त्यात घट होताना दिसत आहे. आता 12 ऑगस्ट 2022 रोजी बंद झालेल्या सत्रात हा शेअर 413.75 रुपयांच्या पातळीवर घसरला. गुंतवणूकदारांनी किती कमाई केली? जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 ऑगस्ट 2021 रोजी या शेअरमध्ये 5 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला त्यावेळी 10,427 शेअर्स मिळाले असते. 5 महिन्यांनंतर, 11 जानेवारी 2022 रोजी तो 925.45 रुपयांवर पोहोचला. ज्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्यांनी त्यांची गुंतवणूक कायम ठेवली असती तर जानेवारीमध्ये ती 96.5 लाख रुपये झाली असती. मात्र जर एखाद्या गुंतवणूकदाराने हा शेअर जानेवारी 2022 मध्ये 925.45 रुपयांच्या पातळीवर विकत घेतला असेल, तर तो यावेळी मोठ्या तोट्यात असेल. जर एखाद्याने त्यावेळी शेअर्समध्ये 10 लाखांची गुंतवणूक केली असती तर त्यांना 1,081 शेअर्स मिळाले असते. मात्र आता ही रक्कम 4.47 लाखांवर आली आहे. कंपनी बद्दल ASAL ऑटोमोबाईल कंपन्यांची उत्पादने तयार करते. कंपनी टाटा मोटर्ससाठी प्रवाशांसाठी तसेच व्यावसायिक वाहनांसाठी मेटल स्टॅम्पिंग असेंब्ली आणि मॉड्यूल तयार करते. याशिवाय ते अशोक लेलँड, जेसीबी, टाटा हिताची, जनरल मोटर्स इंडिया, फियाट इंडिया, पियाजिओ वाहने आणि एमजी मोटर्स यांना त्यांची उत्पादने विकते.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या