Home /News /money /

तुम्हालाही आला आहे असा SMS किंवा ईमेल तर वेळीच व्हा अलर्ट! बुडेल तुमच्या कष्टाची कमाई

तुम्हालाही आला आहे असा SMS किंवा ईमेल तर वेळीच व्हा अलर्ट! बुडेल तुमच्या कष्टाची कमाई

भारत सरकारच्या नावाने बनावट लॉटरी स्कॅम चालवले जात आहेत. हे फसवणूक करणारे तुम्ही भाग्यवान विजेते असल्याचा मेसेज ग्राहकांना पाठवतात आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतात.

    नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: एसएमएसच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातून (Beware of Fake SMS and Email)  फसवणूक केल्याचे अनेक प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत. त्यामुळे अशा घटनांपासून वाचायचे असेल तर प्रत्यकाने सावध असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने ट्वीट करून अशा एसएमएस आणि ई-मेलबाबत सावध (PIB Fact Check Alert) राहण्यास सांगितले आहे. भारत सरकारच्या नावाने बनावट लॉटरी स्कॅम चालवले जात आहेत. हे फसवणूक करणारे तुम्ही भाग्यवान विजेते असल्याचा मेसेज ग्राहकांना पाठवतात आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेतात. अशाप्रकारे लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय आहेत. जर तुम्हाला लॉटरीशी संबंधित संदेश, ईमेल किंवा कॉल आला असेल तरल तर वेळीच सावध व्हा! या SMS मध्ये करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी केंद्रीय संस्था असणाऱ्या पीआयबीने केली. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) च्या टीमने या प्रकारच्या लॉटरीबाबत सावध राहण्यास सांगितले आहे. वाचा-तुम्हाला मिळाले का Aditya Birla Sun Life AMC चे शेअर्स? अशाप्रकारे त्वरित तपासा PIB ने केलं आहे ट्वीट PIB ने ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, अशा बनावट लॉटरीशी संबंधित संदेश, कॉल आणि ईमेलपासून सावध राहा, हे फसवणूक करणाऱ्यांचे आर्थिक फसवणुकीचे प्रयत्न आहेत. #PIBFacTree पाहा आणि स्वतःला फसवण्यापासून वाचवा. जर तुम्हाला अशी कोणतीही लॉटरी जिंकण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांकडून फोन कॉल/ईमेल/मेसेज आला तर लगेच सतर्क व्हा. तुम्हीही करू शकता फॅक्टचेक जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: PIB

    पुढील बातम्या