मुंबई, 13 ऑगस्ट : तुमच्या घरी सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी असतील तर तुम्ही यावर पैसे कमावू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) गोल्ड डिपाॅझिट स्कीम (R-GDS )वर चांगलं व्याज मिळतंच. शिवाय इतर फायदेही आहेत. SBI सोन्याच्या शुद्धतेच्या आधारे तुम्हाला सोन्याचं प्रमाणपत्र देते. तुमचा फिक्स्ड डिपाॅझिटचा काळ संपला की मग 3,4,5 किंवा 6 वर्षांनी त्या सोन्यावर सोन्याच्या रूपात किंवा पैशाच्या रूपात व्याजासहित त्या वेळेच्या दराप्रमाणे पैसे घेऊ शकता. तुम्ही घरी ठेवलेल्या सोन्याला या स्कीममध्ये लावू शकता. म्हणजे चोरीचं टेंशन राहणार नाही आणि सोन्यावर व्याजही मिळेल. कोण करू शकतं गुंतवणूक? SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार भारतात राहणारी कुणीही व्यक्ती ही स्कीम घेऊ शकतो. सिंगल आणि जाॅइंट अकाउंटही उघडू शकतात. एचयुएफ, पार्टनरशिप फर्मही यात गुंतवणूक करू शकतात. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातल्या किमती कमीत कमी किती सोनं गुंतवावं लागतं? या स्कीममध्ये कमीत कमी 30 ग्रॅम सोनं गुंतवावं लागतं. जास्तीत जास्त कितीही गुंतवू शकता. स्कीम मध्येच बंद केली तर दंड एक वर्षाआधी पैसे काढले तर व्याज दरावर दंड पडेल. मीडियम टर्मची गुंतवणूक 3 वर्षांची असते तर लाँग टर्मची गुंतवणूक 5 वर्षांची असते. त्याआधी पैसे काढले तर दंड पडतो. ‘सांगली, कोल्हापुरातील महापुराला सरकारच जबाबदार?’ पाहा SPECIAL REPORT कुठल्या शाखेत मिळणार स्कीमचा फायदा? SBI च्या मुंबई, दिल्ली, हैद्राबाद आणि कोईमतूर इथल्या शाखांमध्ये ही स्कीम आहे. किती वर्षांसाठी ठेवायचं सोनं? या योजनेत 1-3 वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल. SBI नं या योजनेचं नाव शाॅर्ट टर्म बँक डिपाॅझिट ठेवलंय. मीडियम आणि लाँग टर्मसाठीचा अवधी क्रमश: 5-7 आणि 12-15 वर्ष आहे. दिवाळीत विमानानं प्रवास करताय? आताच बुक करा तिकीट, नाही तर खिशाला ‘इतकी’ कात्री कर्जाची सुविधा SBI या ठेवीवर 75 टक्क्यांपर्यंत व्याज देते. गोल्ड डिपाॅझिट स्कीमवर तुम्हाला कर्जही मिळतं. सोन्याचा दर वाढला तर मिळेल जास्त फायदा गोल्ड डिपाॅझिट मॅच्युअर झालं की मिळणारे पैसे हे त्यावेळच्या सोन्याच्या दराप्रमाणे असतात. याचा फायदा होतो. असा फायदा सोनं लाॅकरमध्ये ठेवून होत नाही. शिवाय लाॅकरची फी वाचते. करात सवलत तुमच्याकडे तुमच्या कमाईपेक्षा जास्त सोनं असेल तर कर भरावा लागतो. SBI गोल्ड डिपाॅझिट योजनेत संपत्ती कर किंवा इन्कम टॅक्स लागत नाही. VIDEO: डॉ. मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत परतणार, सकाळच्या टॉप18 न्यूज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.