पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातल्या किमती

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातल्या किमती

Petrol, Diesel - पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : आज पेट्रोल-डिझेलचा दर स्थिर राहिलाय. काल (12ऑगस्ट) पेट्रोलच्या दरात काही बदल झाले नाहीत. काल डिझेल मात्र 6 पैसे कमी झालं होतं. त्याआधी रविवारी पेट्रोल 15 पैसे कमी झालं होतं. आज ( 13 ऑगस्ट) 1 लीटर पेट्रोलचा दर 71.99 रुपये प्रति लीटर झालाय. तर डिझेल 65.43 रुपये आहे.

महानगरांतले पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबईत आता 1 लीटर पेट्रोलची किंमत 77.65 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेल 68.60 रुपये प्रति लीटर मिळतंय. कोलकत्त्यात 1 लीटर पेट्रोलची किंमत 74.69 रुपये आहे. तर डिझेल 67.81 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत आता 1 लीटर पेट्रोलची किंमत 74.78 रुपये आहे. तर 1 लीटर डिझेल 69.13 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत डिझेलची किंमत फक्त 3 पैसे कमी झालीय.

VIDEO: डॉ. मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत परतणार, सकाळच्या टॉप18 न्यूज

सकाळी 6 वाजता ठरतात दर

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. त्याबरोबर आंतरराष्ट्रीय पेट्रोल-डिझेलच्या किमतींचाही विचार केला जातो.

दिवाळीत विमानानं प्रवास करताय? आताच बुक करा तिकीट, नाही तर खिशाला 'इतकी' कात्री

पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत आलं तर काय होईल ?

पेट्रोलची जेवढी किंमत असते तेवढाच कर त्यावर भरावा लागतो. कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते रिफायनरीमध्ये नेलं जातं आणि नंतर शुद्ध झालेलं पेट्रोल मिळतं. अशा पेट्रोल आणि डिझेलवर कर द्यावा लागतो. सगळ्यात पहिल्यांदा सरकार अबकारी कर लावतं. त्यानंतर त्या त्या राज्यांतही कर लावला जातो. त्याला सेल्स टॅक्स किंवा व्हॅट म्हटलं जातं.

पगार होईना, आता पोरांसाठी घरं कसं उभं करायचं, कोल्हापूरकराला अश्रू अनावर

हे सगळे कर लागल्यानंतर पेट्रोल पंपाचा डीलर त्यावर आपलं कमिशन जोडतो. काही ठिकाणी उत्पादन शुल्काशिवाय अतिरिक्त करही लावला जातो. या सगळ्या करांमुळे राज्यांची कमाई वाढते.

पेट्रोल - डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर ते सामान्य माणसाच्या हिताचं ठरेल पण यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं नुकसान होऊ शकतं.

VIDEO: लवासा सिटीमुळे निसर्गाचा मुडदा पडला, महापुरावर बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर

Published by: Sonali Deshpande
First published: August 13, 2019, 10:57 AM IST
Tags: petrol

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading