दिवाळीत विमानानं प्रवास करताय? आताच बुक करा तिकीट, नाही तर खिशाला 'इतकी' कात्री

दिवाळीत विमानानं प्रवास करताय? आताच बुक करा तिकीट, नाही तर खिशाला 'इतकी' कात्री

Air Travel - तुम्ही दिवाळीत तुम्ही विमानानं बाहेरगावी जाणार असाल तर आताच प्लॅन करा

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : तुम्ही दिवाळीत तुमच्या नातेवाईकांना भेटायला जायचा प्लॅन करताय? तुम्ही विमानानं जाणार असाल तर मग आताच तिकीट बुक करा. कारण विमानाचं तिकीट महाग होऊ शकतं. आधीच्या सणांच्या वेळचं देशातल्या विमानाचं तिकीट पाहता तुलनेनं यावेळचं अजून महाग झालेलं नाही. पण ते होऊ शकतं.

गेल्या वर्षाच्या तुलनेत सिट्सची संख्या जास्त

फायनॅन्शियल एक्सप्रेसच्या बातमीनुसार सध्या विमानाची भाडेवाढ झालेली नाही. कारण यावेळच्या सीट्स जास्त आहेत. कमी भाड्याची विमानं स्पाइसजेट आणि इंडिगो आपल्या विमानांच्या संख्येत वाढ करतेय.

ATM मधून पैसे काढताना 'अशी' घ्या काळजी, नाही तर रिकामं होईल तुमचं अकाउंट

सप्टेंबरमध्ये वाढतील विमानाचे दर

सप्टेंबरपासून सगळीकडे सणवार सुरू होतायत. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असे लागोपाठ सण येतायत.  या काळात विमानाचे दर वाढतात. कारण सणासुदीला मागणीही जास्त असते.

मुकेश अंबानींची मोठी घोषणा, HD टीव्ही मिळणार मोफत

या मार्गावर 39 टक्के वाढले दर

5 महत्त्वाच्या मार्गांवर विमानाचे दर वाढले आहेत. दिल्ली-मुंबई, दिल्ली-बंगळुरू, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-हैदराबाद आणि दिल्ली-कोलकत्ता  या मार्गावरचे विमान दर 39 टक्के वाढलेत.

मुख्य मार्गावर दर वाढवले नाहीत

ट्रॅव्हल पोर्टल क्लियरट्रिपच्या म्हणण्याप्रमाणे 15 दिवसांच्या आत तिकीट बुक केलंत तर फारसा बदल झालेला नाही. पण दक्षिणेकडे आलेले पूर आणि पाऊस यामुळे विमान दरात वाढ झालीय.

जिओ फायबरची सुविधा मिळणार 5 सप्टेंबरपासून, देशभरात करू शकणार मोफत फोन

दरम्यान, कलम 370 हटवल्यानंतर  मोदी सरकारनं  दहशतवादी हल्ल्याची शंका असल्यानं सुरक्षेची पूर्ण काळजी घेतलीय. म्हणून देशातल्या सर्व विमानतळांवरची सुरक्षा वाढवलीय. त्यामुळे देशात विमान प्रवास असेल तर 3 तास आधी विमानतळावर पोचावं लागेल आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करायचा असेल तर 4 तास आधी विमानतळावर पोचावं लागेल. विमानतळावर ड्रोन, माॅडल आणि मायक्रोलाइट एअरक्राफ्ट सुरक्षेसाठी तैनात असतील.

नागरिक उड्डाण सुरक्षा ब्युरोनं सांगितलंय की स्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षेला घेऊन हे पाऊल उचललं गेलंय. नवा नियम 10 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत लागू राहील. एरवी देशातल्या विमानप्रवासासाठी 2 तास आणि आंतरराष्ट्रीय विमानप्रवासासाठी 3 तास अगोदर जावं लागायचं.

30 ऑगस्टपर्यंत विमानतळावर व्हिजिटर पास नाही मिळणार. ब्युरोनं व्हिजिटर्सची एंट्री बंद केलीय.

विमानतळावर येणाऱ्या सर्व कार्सच्या तपासण्या होतील. कुठलीही कार पार्किंगमध्ये उभी असेल, तर तिचीही तपासणी होईल. सर्वच प्रवाशांना विमानतळावर एंट्री केल्यानंतर विमानात चढेपर्यंत बऱ्याच तपासण्यांना तोंड द्यावं लागेल.

VIDEO : महापूर ओसरल्यानंतरचं भीषण दृष्य, पोल्ट्रीतील हजारो कोंबड्यांना जलसमाधी

Published by: Sonali Deshpande
First published: August 12, 2019, 6:08 PM IST
Tags: air travel

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading