जाहिरात
मराठी बातम्या / मनी / गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! SBI ने वाढवली स्पेशल एफडीची लास्ट डेट

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! SBI ने वाढवली स्पेशल एफडीची लास्ट डेट

फिक्स्ड डिपॉझिट

फिक्स्ड डिपॉझिट

Fixed Deposit: भारतात एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. दरम्यान एसबीआयने एक स्पेशल एफडीची सुविधा सुरु केली होती. या एफडीची अखेरची तारीख आता वाढवण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Fixed Deposit: स्टेट बँक ऑफ इंडियाने सीनियर सिटीझनच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्किम पुन्हा वाढवली आहे. SBI ने 20 मे 2020 रोजी VCare सिनियर सिटीझन स्पेशल FD आणली होती. ज्यामध्ये गुंतवणुकीची तारीख सप्टेंबर 2020 पर्यंत देण्यात आली होती. यानंतर, गुंतवणुकीची अखेरची तारीख 31 मार्च 2023 पर्यंत ठेवण्यात आली होती. आता हिच तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

एसबीआयने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी सुरू केली आहे. जेणेकरुन त्यांच्या उत्पन्नाच्या सुरक्षिततेसोबतच त्यांना जास्त व्याजाचा लाभ मिळू शकेल. विशेष FD अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 50 ते 100 बेसिस पॉइंट्स अधिक व्याज दिले जात आहे.

विशेष FD अंतर्गत किती व्याज लागतं

या स्पेशल एफडी अंतर्गत, बँक 5 वर्षे ते 10 वर्षांच्या कालावधीवर 7.50 टक्के व्याज देत आहेत. तुम्हाला या एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही बँक शाखा, इंटरनेट बँकिंग किंवा योनोद्वारे बुक करू शकता. ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने ही विशेष एफडी सुरू करण्यात आली आहे.

FD बेस्ट की डेट म्यूच्युअल फंड? कशात जास्त सुरक्षित असतो पैसा? जाणून घ्या एक्सपर्ट काय सांगतात

या एफडीवर किती व्याज मिळतं?

7 ते 45 दिवसांच्या कालावधीवर 3.5 % व्याज मिळतं. 46 ते 179 दिवसांच्या कालावधीवर 5.75% व्याज दिलं जातं. 180 दिवस ते 210 दिवसांसाठी 5.75 % व्याज दिलं जातं. 211 दिवस ते 1 वर्षांसाठी 6.25 % व्याज दिलं जातं. 1 वर्ष ते 2 वर्षांसाठी 7.3 % व्याज, 2 ते तीन वर्षांसाठी 7.5 % व्याज, 3 ते 5 वर्षांसाठी 7 % व्याज , 5 ते 10 वर्षांसाठी 7.50 % पेक्षा व्याज दिलं जातं.

तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरं की बनावट? कसं ओळखायचं? ही आहे ट्रिक

लोनची सुविधाही उपलब्ध

जर कोणी या एफडी योजनेत गुंतवणूक केली तर त्याला कर्जाची सुविधाही दिली जाते. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला उत्पन्नावर टीडीएस चार्ज देखील भरावा लागेल. आणखी कोणत्या बँकांमध्ये मिळते एफडी सुविधा SBI सोबतच, ICICI बँकेचे स्पेशल FD व्याज 7 एप्रिल रोजी संपेल. HDFC आणि IDFC स्पेशल एफडी अपडेट केलेले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात