नवी दिल्ली, 25 मे : लॉकडाउन काळात अनेक लोक प्रत्येक्ष न भेटता, मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यात व्हॉट्सअॅप (WhatsApp) तर यात सर्वात महत्त्वाचं ठरत असून, अनेक जण मेसेज, चॅटिंग, ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंगद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. मेसेज करण्यापासून ते मीडिया फाईल्स पाठवण्यापर्यंत अनेक कामं व्हॉट्सअॅपवर केली जातात.
व्हॉट्सअॅपवर अनेक फॉर्वर्ड येत असतात, परंतु अनेक युजर्स कोणतीही शहानिशा न करता फॉर्वर्ड आलेले मेसेज जसेच्या-तसे आणखी पुढे पाठवतात. या फॉर्वर्ड मेसेजमध्ये अनेकदा फ्रॉड मेसेजचाही समावेश असू शकतो. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर 21 दिवसांत पैसे डबल होण्यासारखे मेसेज, स्किम चुकूनही पाठवू नका. अशा प्रकारच्या लिंक हॅकर्सकडून फ्रॉड करण्यासाठीही पाठवलेल्या असू शकतात. त्यामुळे अकाउंट खाली होण्याचा धोका निर्माण होतो.
त्याशिवाय, व्हॉट्सअॅपवर धमकवणारे मेसेज, अश्लील मेसेजही फॉर्वर्ड करू नका.
व्हॉट्सअॅपवर खोटं-बनावट, फेक अकाउंट बनवून लोकांना त्रास देण्याचं कामही करू नका. फेक अकाउंट बनवून त्याचा चुकीचा वापर करणं गुन्ह्याच्या कक्षेत येतं. त्यामुळे असं करणं तुम्हाला धोक्यात टाकू शकतं.
व्हॉट्सअॅपवर कोणत्याही धर्माबद्दलचे द्वेष पसरवणारे मेसेज पाठवू नका. तसंच एखाद्या धार्मिक स्थळाबाबतही द्वेष पसरवणारे मेसेज, फोटो पाठवू नका. तुम्हाला आलेले फॉर्वर्डही आणखी पुढे पाठवू नका. अन्यथा असे मेसेज केल्याप्रकरणी अटकही होऊ शकते.
हिंसेसाठी संवेदनशील विषयांवर खोट्या, फेक बातम्या पसरवणं किंवा मल्टीमीडिया फाईल्स शेअर करणंदेखील मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी करणं अडचणीत आणू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.