जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI ग्राहकांची कामं आता घरबसल्या होणार; 'हे' टोल फ्री फोन नंबरवर येतील कामी

SBI ग्राहकांची कामं आता घरबसल्या होणार; 'हे' टोल फ्री फोन नंबरवर येतील कामी

SBI ग्राहकांची कामं आता घरबसल्या होणार; 'हे' टोल फ्री फोन नंबरवर येतील कामी

खात्यातील अंतिम शिल्लक जाणून घेण्यासाठी SBI ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल फोनवरून बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या मागील 5 वेळा केलेले व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 जुलै : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन टोल फ्री नंबर (Tool Free Number) जारी केला आहे. या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकांशी संबंधित कामाचा निपटारा करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. परंतु लक्षात ठेवा की केवळ तेच ग्राहक या टोल फ्री क्रमांकाचा लाभ घेऊ शकतात. ज्याचा मोबाईल क्रमांक नोंदणीकृत आहे. एसबीआयने एका ट्वीटद्वारे टोल फ्री नंबरची माहिती दिली आहे. एसबीआयच्या या नवीन टोल फ्री क्रमांकामुळे ग्राहकांना रविवार किंवा सुट्टीच्या दिवशीही बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे. एकूणच, आता एसबीआयचे ग्राहक घरबसल्या बँकेशी संबंधित अनेक कामे मार्गी लावू शकतील. SBI चा नवीन टोल फ्री नंबर जाणून घ्या SBI ने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन टोल फ्री नंबर जारी केले आहेत. देशातील कोणत्या शहरात घर घेणे सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त, पाहा संपू्र्ण लिस्ट

जाहिरात

टोल फ्री क्रमांक 1800 1234 आणि 1800-2100 या क्रमांकांवर कॉल करून तुम्ही घरबसल्या बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. खात्यातील अंतिम शिल्लक जाणून घेण्यासाठी SBI ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल फोनवरून बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या मागील 5 वेळा केलेले व्यवहारांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता. Child Saving Plan: ‘या’ योजनेत दररोज जमा करा फक्त 67 रुपये, 5 वर्षात मूल होईल लखपती फोनवर या सुविधा उपलब्ध असतील नोंदणीकृत नंबरवरून कॉल करून, तुम्ही एटीएम कार्ड ब्लॉकिंग आणि डिस्पॅच स्थितीबद्दल माहिती मिळवू शकता. जर तुमचे नवीन एटीएम कार्ड आले असेल, तर या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून त्यासाठीचा पिनही तयार केला जाऊ शकतो. एसबीचे हे नंबर वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला शाखेत जाण्याची गरज नाही. डिस्पॅच स्थिती तपासा, टीडीएस तपशील आणि ठेव व्याज प्रमाणपत्र देखील ई-मेलद्वारे गोळा केले जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात