मुंबई 4 जुलै : आजच्या युगात, तरुण जोडपी जेव्हा पालक बनण्याचा विचार करतात, तेव्हा ते त्यांच्या होणाऱ्या मुलाशी संबंधित आर्थिक नियोजन (Child Saving Schemes) देखील सुरू करतात. आता तुम्हीही तुमच्या बाळाचे नियोजन करत असाल किंवा नुकतेच पालक झाला असाल, तर तुमच्या नवजात बाळासाठी ‘या’ योजनेत दररोज फक्त 67 रुपये गुंतवा. तुमचे मूल 5 वर्षांचे होईपर्यंत ते लखपती झालेलं असेल. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी उघडा (Open RD in Post office)- भारतात छोट्या बचतीसाठी (Small Savings) सर्वोत्तम पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस बचत योजना (Post Office Saving Schemes) होय. देशभरात दीड लाखांहून अधिक पोस्ट ऑफिस आहेत. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या घराजवळच मुलांसाठी बचतीचा हा उत्तम पर्याय मिळेल. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांपैकी एक म्हणजे 5 वर्षांची आरडी. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागेल. पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने ही आरडी उघडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. सध्याच्या नियमांनुसार, पोस्ट ऑफिस आरडीवर (Post office RD) 5.8 टक्के वार्षिक व्याज उपलब्ध आहे. हे सामान्य बचत खात्याच्या व्याजापेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, हे व्याज दर तिमाहीत चक्रवाढ पद्धतीने तुमच्या रकमेत जोडले जाते. हेही वाचा: महागाईचा उच्चांक : म्युच्युअल फंडांचं गुंतवणूक धोरण ठरवण्यासाठी चांगली संधी? एका महिन्यात जमा करा फक्त 2000 रुपये- जर तुम्ही तुमच्या नवजात बाळाच्या नावाने हे आरडी खाते उघडले तर दररोज 67 रुपये दराने तुम्हाला एका महिन्यात फक्त 2,000 रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे, 5 वर्षांच्या कालावधीत, तुम्ही या खात्यात 1.20 लाख रुपये जमा कराल आणि जेव्हा तुमचे मूल 5 वर्षांचे होईल, तेव्हा ते लखपती होईल. त्याच वेळी, या रकमेत व्याजाची रक्कम जोडली गेली असेल आणि तुम्हाला ते मॅच्युरिटीसह मिळेल. अशा प्रकारे तुमच्या मुलाच्या नावावर मोठी रक्कम जमा केली जाईल. हेही वाचा: देशातील कोणत्या शहरात घर घेणे सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त, पाहा संपू्र्ण लिस्ट कर्ज आणि प्री-मॅच्युरिटी सुविधा- जर तुम्हाला अचानक या RD मध्ये जमा केलेल्या पैशांची गरज भासली तर यामध्ये तुम्हाला 3 वर्षांनंतर प्री-मॅच्युरिटीची सुविधा देखील मिळते. अशा परिस्थितीत ही रक्कम मुलाच्या शाळेत प्रवेशाच्या वेळी उपयोगी पडू शकते. त्याच वेळी, ही योजना सतत एक वर्ष चालवल्यानंतर, तुम्ही त्याऐवजी कर्ज देखील घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.