मुंबई, 3 जुलै : स्वत:चं घर खरेदी करणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र घर खरेदी करणे तितकं सोपं नसतं. कारण घरांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमती लोकांच्या कमाईसोबत जुळत नाहीत. मात्र देशातील प्रत्येक शहरातील परिस्थिती वेगळी आहे. देशातील वेगवेगळ्या शहरात घरांच्या किमती कमी जास्त आहे. देशातील कोणत्या शहरात घर स्वस्त आहे आणि कोणत्या शहरात महाग आहे, यावर एक नजर टाकूया. अहमदाबाद गुजरातची राजधानी अहमदाबाद हाऊसिंग अफोर्डेबिलिटी इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 22 टक्के आहे. 2019 पासून भारतातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये हाऊसिंग मार्केटच्या दृष्टीने हे सर्वात स्वस्त आहे. पुणे पुणे हे स्वस्त घरांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षांत त्याचा अफोर्डेबिलिटी इंडेक्सही सुधारला आहे. 2022 मध्ये पुण्याचा परवडणारा निर्देशांक 26 टक्के आहे. मात्र, गेल्या वर्षी हे प्रमाण 24 टक्के होते. चेन्नई पुण्याबरोबरच चेन्नईचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स यंदा 26 टक्के आहे. गेल्या वर्षी ते 25 टक्के होते. 2019 मध्ये साथीच्या आजारापूर्वी ते 29 टक्के होते आणि तेव्हापासून ते 3 टक्क्यांनी घसरले आहे. बंगळुरू परवडण्याच्या घरांच्या बाबतीत मोठ्या शहरांमध्ये अहमदाबाद, पुणे आणि चेन्नईनंतर बंगळुरुचा नंबर लागतो. त्याचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 28 टक्के आहे. जे गेल्या वर्षी 26 टक्के होते. दिल्ली दिल्ली शहराचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 30 टक्के आहे, जो गेल्या वर्षी 28 टक्के होता आणि त्यापूर्वी 38 टक्के होता. दिल्ली हे महागड्या निवासी बाजारपेठांपैकी एक आहे. हैदराबाद घरांच्या परवडण्याच्या बाबतीत हैदराबाद हे महागडे शहर आहे. मुंबई मुंबई हे भारतातील प्रमुख शहरांमधील सर्वात महागडे शहर आहे. मुंबईत घर घेणे सर्वात महाग आहे. त्याचा अफोर्डेबिलिटी इंडेक्स 2021 मध्ये 53 टक्के होता, जो यावर्षी 56 टक्के झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.