नवी दिल्ली, 04 डिसेंबर: देशभरात बँकिंग फ्रॉडची प्रकरणं (Banking Fraud) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. प्रत्येक वेळी नवनवीन प्रकार वापरून भामटे सामान्यांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारच्या बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावध करत असते. आता बँकेने आणखी एक अलर्ट सामान्यांना पाठवला आहे. बँकेने यावेळी पाठवलेला अलर्ट ऑनलाइन सर्च (Online Search) बाबत आहे. बँकेने सर्व ग्राहकांना ऑनलाइन सर्चबद्दल सांगितले आहे. साधारणत: अनेक ग्राहक बँकेच्या साइटवर जाण्यासाठी गुगल सर्च किंवा इतर ब्राउजरचा वापर करून साइट व्हिझीट करतात. एसबीआयने असं म्हटलं आहे की, सर्व सर्च रिझल्ट बरोबर असतीलच असं नाही. या समस्येपासून वाचण्यासाठी बँकेने काही हेल्पलाइन क्रमांक आणि वेबसाइट जारी केली आहे.
There’s a reason why we ask our customers to check our official website for banking related information and contact numbers because not everything you find on the internet is genuine.#SBI #StateBankOfIndia #StaySafe #StayVigilant #CustomerCare #SafetyTips pic.twitter.com/JtkhbcDKHO
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 2, 2020
बँकेविषयी अपडेटसाठी https://bank.sbi या साइटवर जा गुगल सर्चवर अनेक ग्राहक फेक साइट्सवर जातात. याविषयी एसबीआयने असं म्हटलं आहे की, बँकेविषयी अपडेट मिळवण्यासाठी https://bank.sbi या साइटवरच जा. या वेबसाइटवर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती मिळेल. (हे वाचा- RBI ने पुरवठा बंद केल्याने ATM मधून नाही येत आहेत 2 हजाराच्या नोटा? काय आहे सत्य) टोल फ्री क्रमांकावरून मिळवा योग्य माहिती अनेकदा ग्राहक गुगल सर्च करून त्याठिकाणी आलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करतात. काही वेळा हा नंबर चुकीचा असू शकतो. ज्यामुळे तुम्ही फसणुकीचे बळी ठरू शकता. याविषयीही इशारा देत बँकेने काही टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. कोणताही एसबीआय ग्राहक 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून बँकेविषयी हवी ती माहिती मिळवू शकतो.