SBI ग्राहकांनो लक्ष द्या! 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान, बंद होऊ शकतं खातं

SBI ग्राहकांनो लक्ष द्या! 10 दिवसात पूर्ण करा ही कामं अन्यथा होईल मोठं नुकसान, बंद होऊ शकतं खातं

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जून: तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे. तुम्ही हे काम पूर्ण न केल्यास तुमच्या खात्यावर परिणाम होईल. SBI ने 44 कोटी ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. बँकेने ग्राहकांना असा अलर्ट पाठवला आहे की 30 जूनपर्यंत ग्राहकांनी त्यांचे पॅन आधारशी (Deadline for Linking PAN with Aadhar Card) लिंक करावे अन्यथा ट्रान्झॅक्शन्समध्ये समस्या येऊ शकते, तुमचे चालू असणारे खाते देखील प्रभावित होऊ शकते. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे केवायसी (Know your Customer) अपडेट करणं देखील आवश्यक आहे.

...अन्यथा निष्क्रिय होईल तुमचं पॅन

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department) पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून निश्चित केली आहे. जर तुम्ही असे केले नाही तर 30 जून नंतर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे ट्रान्झॅक्शन करताना अडचणी येऊ शकतात. अर्थात ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत. त्याचप्रमाणे सरकारी योजनेचा लाभ मिळवताना किंवा सब्सिडी मिळवताना अडचणी येऊ शकतात. याशिवाय तुम्हाला आयकर कायद्याअंतर्गत 1000 रुपयांचा दंड देखील भरावा लागेल. बँकेने ट्वीट करत पॅन आधारशी लिंक करण्याचा सल्ला दिला आहे. आयकर कायदा 1961 मध्ये जोडण्यात आलेल्या कलम 234 एच मुळे हा नियम बदलला आहे.

हे वाचा-ITR: 30 जूनपर्यंत हे काम न केल्यास बसेल आर्थिक फटका, भरावा लागेल दुप्पट TDS

केवायसी अपडेट अनिवार्य

SBI मध्ये केवायसी करण्याची डेडलाइन 30 जून आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सगळ्या बँक खात्यांसाठी KYC तपशील अपडेट करणं सक्तीचं केलं आहे. KYC नसेल तर बँक खातं उघडणं आणि पैसे गुंतवणंही शक्य होत नाही. एवढंच नाही तर हा तपशील दिला नाही तर खात्यामधले बँक व्यवहारही रोखले जाऊ शकतात. हे काम पूर्ण करण्याकरता तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. केवायसी अपडेशनची कागदपत्र पोस्टाने किंवा मेलद्वारे पाठवता येऊ शकतात. केवायसी करणं जरूरी आहे कारण त्यामुळे बँक आणि ग्राहकांमधील व्यवहार सुलभ होतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 19, 2021, 9:37 PM IST

ताज्या बातम्या