जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI ने बदलले क्रेडिट कार्ड संबंधित नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम!

SBI ने बदलले क्रेडिट कार्ड संबंधित नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम!

एसबीआय क्रेडिट कार्ड रुल

एसबीआय क्रेडिट कार्ड रुल

SBI Credit Card Rules: स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसने आपल्या कार्डधारकांसाठी काही नियम बदलले आहेत. जाणून घेऊया नवीन नियम.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 मे: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसने 1 मे 2023 पासून काही नियम बदलले आहेत. कंपनीने आपल्या वेबसाइटवर याविषयी माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस अनेक क्रेडिट कार्ड जारी करतात आणि कार्डच्या प्रकारानुसार ऑफर बदलतात.

News18लोकमत
News18लोकमत

SBI क्रेडिट कार्डमध्ये झालेले लेटेस्ट बदल कोणते?

-SBI कार्डच्या वेबसाइटनुसार, 5 लाख रुपये माइलस्टोन खर्चावर ऑरम (AURUM) कार्डधारकांना आता आरबीएल लक्सकडून 5 हजार रुपयांचं कूपन मिळणार नाही. मात्र याव्यतिरिक्त 1 मे, 2023 पासून Tata CLiQ Luxury कडून व्हाउचर मिळेल. -1 मेपासून ऑरम कार्डमध्ये ईजीडायनर प्राइम आणि लेंसकार्ट गोल्ड मेंबरशिपचे बेनिफिट मिळणार नाहीत. -1 मे 2023 पासून, 5X रिवॉर्ड पॉइंट्सऐवजी, SimplyClick SBI कार्ड आणि SimplyClick Advantageरेंट पेमेंट ट्रांझेक्शनवर 1X रिवॉर्ड पॉइंट दिले जात आहेत. -1 एप्रिल 2023 पासून, SBI कार्डने SimplyClick SBI कार्ड आणि SimplyClick Advantage सह Lenskart ऑनलाइन शॉपिंगवर 10X रिवॉर्ड पॉइंट्सऐवजी 5X रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्यास सुरुवात केली आहे. मात्र तुमच्या कार्डवर अजुनही Apollo 24X7, Bookmyshow, Cleartrip, EasyDiner आणि Netmeds वरून ऑनलाइन खरेदीवर 10X रिवॉर्ड पॉइंट मिळतील.

18 महिन्यांच्या FD वर मिळतंय 7.75% व्याज, हे आहेत शानदार ऑफर; कोणती बँक देतेय संधी?

-कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंटवर प्रोसेसिंग फी वाढवली आहे. एसबीआय कार्डने यूजर्सना पाठवलेल्या एसएमएसमध्ये सांगितले होते की, आता त्यांना 99 रुपये + टॅक्सऐवजी 199 रुपये + टॅक्स भरावा लागेल. हे नियम 17 मार्च 2023 पासून लागू झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात