तुमचं SBI मध्ये खातं असेल तर 28 फेब्रुवारीपर्यंत करा हे काम नाहीतर खातं होईल ब्लॉक

तुमचं SBI मध्ये खातं असेल तर 28 फेब्रुवारीपर्यंत करा हे काम नाहीतर खातं होईल ब्लॉक

SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना SMS पाठवून एक अलर्ट पाठवला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना SMS पाठवून अलर्ट पाठवला आहे. यामध्ये ग्राहकांनी आपला KYC तपशील अपडेट केला नाही तर त्यांचं खातं 28 फेब्रुवारीला बंद केलं जाईल, असं या अलर्टमध्ये म्हटलं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)सगळ्या बँक खात्यांसाठी KYC तपशील अपडेट करणं सक्तीचं केलं आहे. KYC नसेल तर बँक खातं उघडणं आणि पैसे गुंतवणंही शक्य होत नाही. एवढंच नाही तर हा तपशील दिला नाही तर खात्यामधले बँक व्यवहारही रोखले जाऊ शकतात.

KYC साठी ही कागदपत्रं गरजेची

SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, KYC साठी ग्राहकांना आपलं ओळखपत्रं द्यावं लागेल. यामध्ये पासपोर्ट, व्होटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, नरेगा कार्ड, पेन्शन, पोस्ट ऑफिसची कागदपत्रं अशा कागदपत्रांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचं बँक खातं असेल तर त्यांच्या काळजीवाहू पालकांचं ओळखपत्र आणि पत्त्याचं प्रमाणपत्र सादर करता येईल.

(हेही वाचा : 1 एप्रिलपासून बदलणार या 2 बँकांची नावं, तुमच्या खात्यातल्या पैशांचं काय होणार?)

KYC अपडेट करण्याकरता ग्राहकांना आपल्या जवळच्या SBI शाखेमध्ये जाऊन अद्ययावत कागदपत्रं द्यावी लागतील. नाहीतर भविष्यात ग्राहकांचे बँकेचे व्यवहार रोखण्यात येतील. ग्राहकांची खाती देखील बँकेकडून फ्रीज केली जातील.

SBI च्या वेबसाइटवर माहिती

SBIच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार केवायसीसाठी द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांवर तोच पत्ता असणं अनिवार्य आहे जो बँकेतील खात्यासाठी भरलेल्या फॉर्म असेल. त्यामुळे SBI कडून पाठवण्यात आलेला Alert SMS ग्राहकांना अत्यंत गांभीर्याने वाचणं गरजेचं आहे.

=======================================================================================

First published: February 10, 2020, 1:56 PM IST
Tags: moneySBI

ताज्या बातम्या