जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 1 एप्रिलपासून बदलणार या 2 बँकांची नावं, तुमच्या खात्यातल्या पैशांचं काय होणार?

1 एप्रिलपासून बदलणार या 2 बँकांची नावं, तुमच्या खात्यातल्या पैशांचं काय होणार?

1 एप्रिलपासून बदलणार या 2 बँकांची नावं, तुमच्या खात्यातल्या पैशांचं काय होणार?

युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता नव्या बँकेचं नाव आणि लोगोची घोषणा करणार आहे. ही बँक एक एप्रिल 2020 पासून अस्तित्वात येईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 8 फेब्रुवारी : पंजाब नॅशनल बँक (PNB), युनायटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India) आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) या बँकांच्या विलिनीकरणानंतर नव्या बँकेचं नाव केंद्र सरकार जाहीर करणार आहे. ही नवी बँक भारतीय स्टेट बँकेच्या नंतर देशातली दुसरी मोठी बँक ठरेल. मागच्या वर्षी सरकारने PNP बँकेत OBC आणि युनायटेड बँकेच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. 1 एप्रिलपासून सुरू होणार बँक युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता नव्या बँकेचं नाव आणि लोगोची घोषणा करणार आहे. ही बँक एक एप्रिल 2020 पासून अस्तित्वात येईल. या 3 बँकांच्या विलिनीकरणासाठी 34 समित्या बनवण्यात आल्या होत्या. या समित्यांनी आपला अहवाल सोपवला आहे. या 3 बँका एकत्र आल्यानंतर या बँकेत 1 लाख कर्मचारी असतील. ग्राहकांवर काय होईल परिणाम? ग्राहकांना नवा अकाउंट नंबर आणि कस्टमर आयडी मिळू शकतो.ज्या ग्राहकांना नवे अकाउंट नंबर किंवा IFSC कोड मिळतील त्यांना ही नवी माहिती इनकम टॅक्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, नॅशनल पेन्शन स्कीम या सगळ्या योजनांमध्ये अपडेट करावी लागेल. SIP किंवा कर्जाच्या हप्त्यांसाठी ग्राहकांना नवा इनस्ट्र्क्शन फॉर्म भरावा लागेल. नवं चेकबुक, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डही मिळू शकतं. एफडी किंवा आरडीवर मिळणाऱ्या व्याजात कोणतेही बदल होणार नाहीत. (हेही वाचा : या योजनेत 10 हजार रुपये गुंतवलेत तर दर महिन्याला होईल 80 हजारांची कमाई) चेक क्लिअर करा ज्या व्याजदराने होमलोन, वाहन कर्ज, पर्सनल लोन घेतलं असेल त्यात काहीही बदल होणार नाही. बँकेच्या काही शाखा बंद होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना नव्या शाखांमध्ये जावं लागू शकतं. विलिनीकरणानंतर सगळ्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसच्या सूचना आणि पोस्ट डेटेड चेक क्लिअर करावे लागतील. ===========================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: banking , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात