जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI च्या या स्किमवर मिळतंय बंपर व्याज! एकदा पैसे लावा मग दरमहा घरबसल्या होईल कमाई

SBI च्या या स्किमवर मिळतंय बंपर व्याज! एकदा पैसे लावा मग दरमहा घरबसल्या होईल कमाई

एसबीआय बँक स्किम

एसबीआय बँक स्किम

SBI अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणारे व्याज मिळते. एकरकमी पैसे जमा करण्यासाठी ही स्किम चांगली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**मुंबई, 7 मे :**स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात विश्वासार्ह बँक मानली जाते. बहुतेक लोक त्यांच्या विविध योजनांमध्ये त्यांची बचत गुंतवतात. सुरक्षित गुंतवणूक आणि गॅरंटीड रिटर्नसाठी या स्किम्स अधिक चांगल्या मानल्या जातात. तुम्हीही अशी योजनांच्या शोधत असाल ज्यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला रेग्यूलर फिक्स्ड इन्कम मिळत असेल तर SBI ची अ‍ॅन्युइटी डिपॉजिट स्कीम तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन असू शकते.

News18लोकमत
News18लोकमत

SBI च्या या स्कीममध्ये तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर दरमहा व्याजासह कमाईची हमी असते. SBI च्या अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला दरमहा प्रिंसिपल अमाउंटसह व्याज दिले जाते. व्याजाचे कॅलक्युलेशन अमाउंटमध्ये जमा राशीवर दर तिमाहीमध्ये कम्पाउंडिंग केले जाते.

किती पैसे जमा करता येतील?

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तुम्हाला अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीम अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर बचत खात्यापेक्षा जास्त व्याज दिले जाते. या योजनेत डिपॉझिटवर तेच व्याज मिळते, जे बँकेच्या टर्म डिपॉझिट म्हणजेच FD वर मिळते. या योजनेत मॅक्सिमम डिपॉझिटवर कोणतीच लिमिट नाही. त्यासोबतच मिनिमम डिपॉझिट कमीत कमी1000 रुपये मंथली अ‍ॅन्युइटीच्या हिशोबाने करावी लागेल. यामध्ये तुम्हाला बँकेकडून युनिव्हर्सल पासबुकही जारी केले जाईल. या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी गुंतवणूक करता येते.

मुलाच्या संपत्तीवर आईचा जास्त हक्क की बायकोचा? काय सांगतो कायदा?

ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे

या योजनेत, ठेवीनंतरच्या महिन्यातील देय तारखेपासून वार्षिकी दिली जाईल. ती तारीख कोणत्याही महिन्यात नसल्यास, पुढील महिन्याच्या एक तारखेला अ‍ॅन्युइटी मिळेल. अ‍ॅन्युइटी टीडीएस कट करुन लिंक्ड सेव्हिंग्स अकाउंट किंवा करंट अकाउंटमध्ये क्रेडिट केले जाईल. एसबीआयची ही योजना आपत्कालीन परिस्थितीतही तुमच्या गरजांची पूर्ण काळजी घेऊन तयार करण्यात आली आहे. गरज पडल्यावर तुम्ही अ‍ॅन्युइटीच्या बॅलेन्स अमाउंटच्या 75 टक्केपर्यंत राशी ओव्हरड्राफ्ट करु शकता.

PPF Rules: मॅच्युरिटीपूर्वीच PPF अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला तर काय? पैसे क्लेम कसे करायचे?

अ‍ॅन्युइटी योजनेत गुंतवणूक कशी करावी?

तुम्हाला SBI च्या अ‍ॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही कोणत्याही जवळच्या शाखेत जाऊन नोंदणी करू शकता. ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. स्कीमचे अकाउंट बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेतही ट्रान्सफर केले जाऊ शकते. यामध्ये इंडिविज्युअल नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे. या अकाउंटचे सिंगल किंवा जॉइंट होल्डिंग असू शकते. डिपॉझिटरचा मृत्यू झाल्यानंतर ही स्किम वेळेपूर्वीच क्लोज केली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: SBI
  • First Published :
जाहिरात
जाहिरात