जाहिरात
मराठी बातम्या / मनी / मुलाच्या संपत्तीवर आईचा जास्त हक्क की बायकोचा? काय सांगतो कायदा?

मुलाच्या संपत्तीवर आईचा जास्त हक्क की बायकोचा? काय सांगतो कायदा?

प्रॉपर्टी नियम

प्रॉपर्टी नियम

आज आपण मालमत्तेसंबंधीत एक नवीन माहिती तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये मुलाच्या संपत्तीवर आईचा आणि बायकोचा किती हक्क असतो आणि त्याचे नियम काय हे आपण जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 मे: एखादी व्यक्ती जिवंत असल्यावर त्याच्या संपत्तीची वाटणी झाली तर काहीच अडचण नसते. मात्र एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कौटुंबिक कलह आपण अनेकदा पाहिले आहेत. वडिलांच्या मालमत्तेवरून अनेकदा वाद होतात. याविषयीचे नियम तुम्हाला माहितीच असतील. आज आपण मुलाच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार आहे? आईची किंवा पत्नीचा? आई जिवंत असताना मुलाचा मृत्यू झाला तरी खूप दुःख होते. देव हे कोणावरही घडू नये. तरीही असे कोणाच्या बाबतीत घडले तर त्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सध्याच्या काळात अनेक कारणांमुळे आईला स्वतःच्या मुलाच्या मालमत्तेत हक्क मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या मालमत्तेतील हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 मध्ये मुलाच्या मालमत्तेवरील अधिकाराबाबत तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये, विवाहित आणि अविवाहित असताना मुलाच्या मृत्यूवर मालमत्तेची वेगवेगळ्या प्रकारे विभागणी केली जाते.

LIC Schemes: एलआयसीच्या ‘या’ योजनांनी रिटायरमेंट होईल टेन्शन फ्री! जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

भारताचा कायदा काय म्हणतो?

अशी अनेक प्रकरणे समोर येतात ज्यात मृत मुलाच्या मालमत्तेत आईला हक्क दिला जात नाही, जे कायद्याच्या विरोधात आहे. परंतु अनेक मातांना याची माहितीही नसते आणि अशा आई वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करू लागतात. पण भारतीय कायद्याच्या मदतीने ती तिच्या हक्कांसाठी लढू शकते, ज्यामुळे तिच्या मृत मुलाच्या मालमत्तेमध्ये तिचा हक्कही मिळेल.

प्रॉपर्टीचे कागदपत्र हरवले तर काय? ड्युप्लिकेट डॉक्युमेंट मिळतात का? जाणून घ्या नियम

मृत मुलाच्या मालमत्तेवर आईचा हक्क किती असतो?

आईला तिच्या मृत मुलाच्या मालमत्तेत तितकाच हिस्सा मिळतो जो तिची पत्नी आणि मुलांना मिळतो. यासोबतच जर पतीच्या मालमत्तेची विभागणी झाली तर पत्नीलाही त्या संपत्तीत मुलांइतकाच हक्क मिळतो. हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 8 नुसार, मुलाच्या मालमत्तेवर पालकांचे हक्क परिभाषित केले आहेत. या अंतर्गत, आई मुलाच्या मालमत्तेची पहिली वारस असते, तर वडील मुलाच्या मालमत्तेचे दुसरे वारसदार असतात. जर मृत व्यक्तीच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि मुले असतील तर मालमत्तेची आई, पत्नी आणि मुले यांच्यात समान वाटणी केली जाते.

विवाहित आणि अविवाहित असल्याच्या स्थितीत काय असतो नियम?

हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, जर पुरुष अविवाहित असेल तर त्याची मालमत्ता पहिल्या वारसाला, त्याच्या आईला आणि दुसऱ्या वारसाला म्हणजेच त्याच्या वडिलांना हस्तांतरित केली जाईल. जर आई हयात नसेल तर मालमत्ता वडील आणि त्यांच्या सह-वारसांना हस्तांतरित केली जाईल. जर मृत व्यक्ती हिंदू विवाहित पुरुष असेल आणि मृत्युपत्राशिवाय मरण पावला असेल. तर त्याच्या पत्नीला हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार मालमत्तेचा वारस मिळेल. अशा परिस्थितीत त्याची पत्नी वर्ग 1 वारस म्हणून गणली जाईल. ती मालमत्ता इतर कायदेशीर वारसांसोबत समान वाटून घेईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात