नवी दिल्ली, 07 मे : कोरोना व्हायरस (Coronavirus)चे संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फ्रॉडचे संकट देखील वाढू लागले आहे. त्यामुळे बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावधान करण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India-SBI) देखील त्यांच्या ग्राहकांना एका मोठ्या फसवणुकीबाबत सावधान केले आहे. काही बनावट माणसं बँक अधिकारी बनून ग्राहकांना फसवत असल्यासंदर्भातील हा अलर्ट आहे. हे भामटे अॅपच्या माध्यमातून ग्राहकांच्या फोन स्क्रीनचा रिमोट अॅक्सेस मिळवत असल्याचे यातून स्पष्ट करण्यात आले आहे. एसबीआयने त्या संदर्भातही माहिती दिली आहे की, अशी फसवणूक झाल्याचे तुमच्या लक्षात आल्यास आणि या भामट्यांची तुम्ही ओळख पटवू शकणार असाल तर तुम्ही कुठे तक्रार नोंदवू शकता. (हे वाचा- तब्बल 40 दिवसानंतर Maruti Suzuki ने विकल्या 50 गाड्या, 25 मार्चपासून होती विक्री ) एसबीआयने ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. epg.cms@sbi.co.in आणि report.phishing@sbi.co.in. यावर तुम्ही मेल करून तक्रार दाखल करू शकता. त्याचप्रमाणे https://cybercrime.gov.in/Default.aspx या वेबसाइटवर जाऊन देखील तक्रार नोंदवता येईल. मात्र हे नुकसान होण्याआधी खबरदारी घेतलेले केव्हाही चांगले. त्यामुळे अशा भुलथापांना ग्राहक बळी पडणार नाहीत. एसबीआयने काही फोटो पोस्ट करत तुम्ही काय करायला हवं आणि काय नको यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
Beware of fraudsters who pose as bank officials and scam people by gaining remote access to their mobile phone screens through an app.
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 6, 2020
Inform us when you identify a scamster through e-mail: epg.cms@sbi.co.in & report.phishing@sbi.co.in
Also, report on https://t.co/L3ihBoVCJs pic.twitter.com/tAjycRZl8u
खाते रिकामे होण्याची भीती एसबीआयने ग्राहकांना सांगितले की हे भामटे बँक अधिकारी बनून ग्राहकांना कॉल करतात आणि सांगतात की तुमचं वॉलेट किंवा बँक केवायसी अवैध आहे आणि डेबिट कार्ड ब्लॉक झाले आहे. तुमची ही समस्या आम्ही ऑनलाइन सोडवू असं सांगून ते ग्राहकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर ते ग्राहकांना एक मोबाइल अॅप डाऊनलोड करायला सांगतात. (हे वाचा- लॉकडाऊन 3.0 मध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता!आणखी तीन महिने मिळणार EMI वर सूट? ) या अॅपमुळे हे भामटे तुमच्या फोनचा अॅक्सेस मिळवू शकतात आणि त्यानंतर बँक डिटेल्स वापरून तुमच्या खात्यातील रक्कम त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. यासाठी लागणाला ओटीपी देखील त्यांना सहज मिळून जातो कारण तुमच्या मोबाइलचा अॅक्सेसच त्यांच्याकडे आहे. फसवणूक कशी टाळाल? SBI ने त्यांच्या ग्राहकांना असा इशारा दिला आहे की फोन कॉल/ई-मेल/एसएमएस/ वेब लिंकच्या माध्यामातून कोणालाही तुमचे बँक डिटेल्स देऊ नका. इंटरनेटवर देण्यात आलेल्या बँकेच्या नंबरवरही विश्वास ठेऊ नका. बँके संबधित काही काम असल्यास बँकेचे अधिकृत फोन अॅप आणि वेबसाइट वापरा. YONO SBI, YONO Lite आणि BHIM SBI Pay अॅप आहेत. तर https://bank.sbi/ ही अधिकृत वेबसाइट आहे. ग्राहकांनी केवळ कस्टमर केअर टोल फ्री नंबर- 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 आणि टोल नंबर- 080-26599990 यावरच संपर्क करावा. संपादन - जान्हवी भाटकर