मराठी बातम्या /बातम्या /मनी /

44 कोटी खातेधारकांना SBIचा अलर्ट! तुमच्या खात्यातून पैसे चोरण्यासाठी होतोय नवीन पद्धतींचा वापर

44 कोटी खातेधारकांना SBIचा अलर्ट! तुमच्या खात्यातून पैसे चोरण्यासाठी होतोय नवीन पद्धतींचा वापर

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या 44 कोटींहून जास्त खातेधारकांसाठी सायबर क्राइमबाबत अलर्ट केले आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या 44 कोटींहून जास्त खातेधारकांसाठी सायबर क्राइमबाबत अलर्ट केले आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या 44 कोटींहून जास्त खातेधारकांसाठी सायबर क्राइमबाबत अलर्ट केले आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 14 एप्रिल : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या 44 कोटींहून जास्त खातेधारकांसाठी सायबर क्राइमबाबत अलर्ट केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे की, काही भामटे नवीन पद्धती आणि तंत्रज्ञान वापरून अनेकांची फसवणूक करत आहेत. सायबर क्राइमसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात येत असल्याने सावधानता बाळगण्यासंदर्भात एसबीआयने हा अलर्ट पाठवला आहे. भारतामध्ये यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी EMI संदर्भातील असाच फ्रॉड समोर आला होता. आरबीआयने 3 महिन्यांकरता ईएमआय स्थगित करण्यास परवानगी दिली आहे. मात्र काही भामटे याचा फायदा घेत ग्राहकांना ओटीपी आणि पीनसंदर्भात विचारणा करत आहेत. ग्राहकांची फसवणूक होण्याआधी सर्व बँकानी त्याबाबत अलर्ट पाठवला होता. SMS द्वारे फसवणूक एसबीआईने त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, हे फसवणूक करणारे लोक ग्राहकांना चूना लावण्यासाठी एसएमएस (SMS) करत आहेत. या एसएमएसमध्ये SBI NetBanking Page शी मिळतंजुळतं पेज सुद्धा दिसत आहे. जर तुम्हाला असा कोणताही एसएमएस आला तर त्वरीत तो डिलीट करण्याचे आवाहन SBI ने केले आहे. या घोटाळ्यात तुम्ही अडकू नये या करता एसबीआयने तुमचा नेट बँकिंगचा पासवर्ड आणि खात्यासंदर्भातील इतर माहिती करण्याची सूचना एसबीआयकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे http://www.onlinesbi.digital ही एक फेक वेबसाइट आहे. (हे वाचा-सोन्याचे दर गाठणार उच्चांक! वर्षाअखेरीस 55 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता) बँकेने  सांगितले आहे की,  जर तुम्हाला असा कोणता मेसेज आला तर तुम्ही epg.cms@sbi.co.in आणि report.phishing@sbi.co.in  यावर ई-मेलद्वारे माहिती देऊ शकता.  त्याचप्रमाणे cybercrime.gov.in/Default.aspx वर तक्रार देखील करू शकता. फॉलो करा या सेफ्टी टिप्स- -कोरोना व्हायरसमुळे सुरू असणाऱ्या लॉकडाउनच्या परिस्थितीत फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बनावट UPI आयडीवरून डोनेशन मागणाऱ्यांपासून सावध राहा. -फंड ट्रान्सफर करण्याआधी तो प्राप्त करणाऱ्याची माहिती मिळवा -कोणत्याही ई-कॉमर्स साइटवर कार्ड डिटेल सेव्ह करु नका (हे वाचा-लॉकडाऊन संपल्यानंतर विमानप्रवास परवडणार का? जाणून घ्या ही महत्त्वाची बाब) -कोणत्याही ई-मेलवर तुमच्या खात्यासंदर्भातील संवेदनशील माहिती देऊ नका -कोरोना व्हायरस संबंधित कोणत्याही बातमीवर क्लिक करण्याआधी सोअर्सची खात्री करा. -कोणताही स्कॅम आढळून आल्यास त्यासंदर्भात रिपोर्ट करा संपादन- जान्हवी भाटकर
First published:

Tags: Coronavirus, SBI

पुढील बातम्या