Home /News /auto-and-tech /

केवळ टॅक्सी सेवा नाही तर आता खरेदी करा जुनी-नवी वाहनं सुद्धा! लाँच झाला Ola Cars प्लॅटफॉर्म

केवळ टॅक्सी सेवा नाही तर आता खरेदी करा जुनी-नवी वाहनं सुद्धा! लाँच झाला Ola Cars प्लॅटफॉर्म

Ola Cars: नागरिकांना वाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ओला कंपनीने इलेक्ट्रिक वाहन (Ola Electric Vehicles) निर्मितीत प्रवेश करण्यापाठोपाठ आता नवी, जुनी वाहन खरेदी-विक्री आणि वित्त पुरवठा क्षेत्रातही प्रवेश केला आहे.

मुंबई, 07 ऑक्टोबर: वाहतूक यंत्रणा ही अत्यंत महत्त्वाची आहे, शहरी नागरिकांना तर त्याची गरज फार भासते. शहरातील प्रवासासाठी आधी बस सेवा पुरेशी होती. नंतर रिक्षा सेवाही आली पण त्यानी भागणार नाही हे लक्षात आल्यावर विविध वाहतूक यंत्रणा उभ्या राहिल्या त्यापैकीच टॅक्सी सेवा. त्याचं नवं रूप म्हणजे ओला, उबर यांच्यासारख्या ऑनलाईन मॉनिटरिंग असणाऱ्या सेवा. या आता आपल्या जगण्याचा भाग झाल्या आहेत. नागरिकांना वाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ओला कंपनीने इलेक्ट्रिक वाहन (Ola Electric Vehicles) निर्मितीत प्रवेश करण्यापाठोपाठ आता नवी, जुनी वाहन खरेदी-विक्री आणि वित्त पुरवठा क्षेत्रातही प्रवेश केला आहे. यासाठी कंपनीने 'ओला कार्स' (Ola cars Update) नावाचा नवीन प्लॅटफॉर्म दाखल केला आहे. Ola च्या अॅपद्वारे (Download Ola App) Old Cars च्या माध्यमातून ग्राहक आता नवीन आणि जुनी वाहनेही खरेदी करू शकणार आहेत. केवळ वाहनाची खरेदी, विक्रीच नाही तर वाहनासाठी वित्त पुरवठा आणि विमा सुविधाही कंपनी पुरवणार आहे. वाहनाची नोंदणी, देखभाल, दुरुस्ती सेवा यासह वाहनाची विक्री करून देण्याची सुविधाही 'ओला कार्स'तर्फे मिळणार आहे. वाहनासंबंधीच्या सर्व सेवा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. Mercedes-Benz ने लाँच केली 'मेड इन इंडिया' S-Class, पुण्यात होणार निर्मिती ओलाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल (Bhavish Agrawal) यांनी नुकतीच ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, 'ग्राहक नवीन वाहन खरेदीसाठी आणि जुन्या वाहनांच्या विक्रीकरता तसंच अन्य सेवांसाठी नवीन पर्याय शोधत आहेत. शोरूममध्ये जाऊन वाहन खरेदी करण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा त्यांना नवीन पर्यायाची अपेक्षा आहे. अधिक पारदर्शकता आणि डिजिटल अनुभव (Digital Experience in buying new Car) हवा आहे. ओला कार्सच्या माध्यमातून ग्राहकांना आम्ही हा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत. नवीन आणि जुन्या वाहनांची खरेदी, विक्री आणि अन्य सेवांसाठी आम्ही एक पूर्णतः नवीन अनुभव देण्यासाठी सज्ज आहोत.' ओला कार्सच्या माध्यमातून जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीसह ओला इलेक्ट्रिक आणि इतर ऑटोमोटिव्ह ब्रँडची नवीन वाहनेही उपलब्ध होतील. सुरुवातीला ही सेवा 30 शहरांमध्ये उपलब्ध होणार असून, पुढील वर्षापर्यंत 100 हून अधिक शहरांमध्ये तिचा विस्तार केला जाईल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. केवळ 24000 रुपयांत Bajaj Pulsar खरेदी करण्याची संधी, पाहा काय आहे ऑफर याचवेळी कंपनीने ओला कार्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अरुण सरदेशमुख (Arun Sirdeshmukh) यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणाही केली आहे. अरुण सरदेशमुख यांनी यापूर्वी अॅमेझॉन इंडिया, रिलायन्स ट्रेंड्स आणि आयबीएम ग्लोबल सर्व्हिसेससारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. विक्री आणि वितरण, सेवा, विपणन, धोरण अंमलबजावणी याची जबाबदारी अरुण सिरदेशमुख सांभाळणार आहेत. ओलाचे संस्थापक भविश अग्रवाल यांनी अरुण सरदेशमुख यांचे स्वागत करत, अरुणसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. ओला कंपनीच्या मोबिलिटीविषयक (Mobility) नवीन ध्येयधोरणांचा पाया बळकट करण्यासाठी कंपनी उत्सुक असल्याचेही अग्रवाल यांनी यावेळी नमूद केले. ओला कार्सच्या नवीन योजनांची घोषणा करताना ओला कार्सचे सीईओ अरुण सरदेशमुख म्हणाले, 'ग्राहकांचा वाहन सेवेचा अनुभव अधिक सुखकारक आणि सुलभ होण्यासाठी तंत्रज्ञान आधारित नवनवीन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ओला कटिबद्ध आहे. ओला कार्सच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना वाहनाची खरेदी आणि विक्रीच नव्हे तर वित्त पुरवठा, विमा तसंच देखभाल आदी सेवांबाबतही संपूर्ण डिजिटल अनुभव देण्यास सज्ज आहोत. येत्या काही महिन्यांत भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासह जुनी दुचाकी वाहनं आणि नवीन वाहनांसाठी वेगळे पर्याय दाखल करण्याचीही आमची योजना आहे.'
First published:

Tags: Money, Taxi

पुढील बातम्या