नवी दिल्ली, 21 सप्टेंबर: देशभरात कोरोना काळात बँकिंग फ्रॉड (Banking Fraud Alert) च्या घटना वाढू लागल्या आहेत. विविध मार्ग वापरून हे भामटे सामान्यांची लुटमार करत आहेत. या फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India Alert to its Customers) वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना सूचना पाठवून अलर्ट करत असते. एसबीआयने अलीकडेच एक ट्वीट करत ग्राहकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बँकेच्या या इशाऱ्याकडे दूर्लक्ष केल्यास तुमच्या खात्यातील सर्व रक्कम लंपास होऊ शकते. एसबीआयने ट्वीट त्यांच्या 44 कोटी ग्राहकांना फेक कस्टमर केअर क्रमांकाविषयी सावध केलं आहे. बँकेने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘बनावट कस्टमर केअर क्रमांकापासून सावध राहा. कृपया योग्य कस्टमर केअर क्रमांक मिळवण्यासाठी एसबीआयची अधिकृत वेबसाइट पाहा. संवेदनशील माहिती कुणासह देखील शेअर करू नका.’
Beware of fraudulent customer care numbers. Please refer to the official website of SBI for correct customer care numbers. Refrain from sharing confidential banking information with anyone.#CyberSafety #CyberCrime #Fraud #BankSafe #SafeWithSBI pic.twitter.com/Q0hbUYjAud
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 18, 2021
हे वाचा- खूशखबर! Bank of Baroda करतंय स्वस्त घरांची विक्री, यादिवशी होणार लिलाव बँकेने या ट्वीटमध्ये एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती चुकीच्या कस्टमर केअर क्रमांकावर चुकून फोन लावते. ज्यामध्ये सर्व माहिती मिळवून ठग खात्यापर्यंत पोहोचतात. व्हिडीओच्या शेवटी असे म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याची त्वरित तक्रार करा. तुम्ही report.phising@sbi.co.in यावर तक्रार करू शकता. किंवा साइबर क्राइम हेल्पलाइन नंबर 155260 यावर संपर्क करू शकता.