नवी दिल्ली, 21 दिल्ली: जर तुम्ही स्वस्त घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda E-Auction) तुमच्यासाठी खास संधी आणली आहे. यामध्ये तुम्ही स्वस्तात घरखरेदी (Residential Property) करू शकता. BoB प्रॉपर्टीचा लिलाव करत आहे. हा लिलाव 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. जी प्रॉपर्टी डिफॉल्ट लिस्टमध्ये आली आहे त्याचा लिलाव होत आहे. IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) ने याबाबत माहिती दिली आहे. बँक ऑफ बडोदाकडून रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. केव्हा होणार लिलाव? बँक ऑफ बडोदाकडून (BOB) ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की 28 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या मेगा ई-लिलावात (Mega E-Auction) सहभागी व्हा. यामध्ये निवासी आणि औद्योगिक प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. तुम्ही योग्य किंमत लावून याठिकाणी मालमत्ता खरेदी करू शकता.
Your chance to own a property is now closer than you think! #BankofBaroda presents Mega e-Auction on 23rd September 2021, where you can get a property of your choice with ease. Know more https://t.co/ejge3HE0ms pic.twitter.com/rtYS7ETy6R
— Bank of Baroda (@bankofbaroda) September 21, 2021
कुठे कराल रजिस्ट्रेशन? बँक ऑफ बडोदाच्या मेगा ई-ऑक्शनमध्ये इच्छूक बिडरला e Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे वाचा- Gold Price Today: पुन्हा घसरले सोन्याचे दर तर चांदी वधारली, तपासा आजचा भाव KYC डॉक्यूमेंटची आवश्यकता त्यानंतर बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा तुम्ही अधिक माहितीकरता https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकवर भेट देऊ शकता हे वाचा- Post Office Scheme: 1500रुपये करा जमा मिळतील 35लाख रुपये; जाणून घ्या कसं बँकेकडून आयोजित केला जातो लिलाव ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. अशाप्रकारच्या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात.