मुंबई, 26 ऑगस्ट: पोस्टाच्या विविध योजनांमधून (Post Office Scheme) तुम्ही कमी गुंतवणुकीतून चांगली कमाई करू शकता. पोस्ट ऑफिसकडून (Post Office) ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक योजना चालवल्या जातात. यामध्ये पोस्टल इन्शुरन्स प्लॅन्सचा (Postal Insurance Plan) देखील समावेश आहे. भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी हे इन्शुरन्स प्लॅन्स अत्यंत फायद्याचे आहेत. पोस्टाच्या अशा एका योजनेबाबत जाणून घ्या ज्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. या स्कीमअंतर्गत तुम्हाला मॅच्युरिटीवर सम अश्योर्डसह बोनस देखील मिळेल. या पॉलिसीचं नाव संतोष पॉलिसी असं आहे. जाणून घ्या सविस्तर
कुणाला मिळेल फायदा?
ही पॉलिसी कमी गुंतवणुकीत अधिक रिटर्न देणारी असली तरी सर्वजण यामध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. या योजनेचा फायदा सरकारी कर्मचारी, निम्न-सरकारी कर्मचारी, सीए, मॅनेजमेंट कन्सलटंट, वकील आणि बँकर या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. जे लोकं सरकार द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत आहेत ते देखील संतोष पॉलिसी घेऊ शकतात. एनएसई किंवा बीएसई लिस्टेड कंपन्यांत काम करणारे कर्मचारी देखील ही पॉलिसी खरेदी करू शकतात.
हे वाचा-मारुती कार घेण्यासाठी करावा लागला होता खटाटोप, Tarun Bajaj यांनी सांगितला किस्सा
ही एक रेग्यूलर प्रीमियम पॉलिसी आहे ज्यामध्ये जेवढ्या वर्षाची पॉलिसी असेल तेवढ्या वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल. ही पॉलिसी कमीत कमी 19 ते जास्तीत जास्त 55 वयवर्ष असणारे नागरिक खरेदी करू शकतात. पॉलिसी घेताना तुम्हाला हे निश्चित करावे लागेल की मॅच्युरिटी कोणत्या वर्षात असेल. तुम्ही वयाच्या 35,40,45,50,55,58 आणि 60व्या वर्षासाठी मॅच्युरिटी निवडू शकता.
किती कराल गुंतवणूक?
पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार या पॉलिसीमध्ये कमीतकमी सम अश्योर्ड 20000 रुपये आणि जास्तीत जास्त 50,00,000 रुपये आहे. अर्थात तुम्ही 20000 ते 50 लाख रुपयांदरम्यानचा विमा संतोष पॉलिसीअंतर्गत घेऊ शकता. तुम्ही दरमहा, तिमाही, सहामाही स्वरुपात या पॉलिसीचा प्रीमियम भरू शकता.
कसे मिळतील 13 लाख?
समजा वयाच्या 30व्या वर्षी तुम्ही हा पोस्टल इन्शुरन्स प्लॅन घेताना 5,00,000 रुपयांच्या सम अश्योर्डची निवड केली आणि 60 व्या वर्षी मॅच्युरिटीचा पर्याय निवडला. अर्थात यामध्ये पॉलिसी टर्म 30 वर्षांची आणि कारण 30व्या वर्षी तुम्ही पॉलिसी घेतली आहे आणि वयाच्या 60व्या वर्षी मॅच्युरिटी आहे. त्यामुळे 30 वर्ष तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल.
हे वाचा-सरकारी बँकेतील कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास कुटुंबाला मिळणार 30 टक्के अधिक पेन्शन
तुम्ही मंथली प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडला तर दरमहा तुम्हाला 1332 रुपये भरावे लागतील, वार्षिक पर्याय निवडला तर 15,508 रुपये भरावे लागतील. 30 वर्षाच्या कालावधीत एकूण 4,55,51 रुपये प्रीमियम म्हणून भरावे लागतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला 5,00,000 रुपये आणि बोनसचे 7,80,000 रुपये मिळतील. अशाप्रकारे एकूण 12,80,000 रुपये तुम्हाला मिळतील. या पॉलिसीत दरवर्षी बोनसची रक्कम जोडली जाते जी शेवटी मॅच्युरिटीवर देण्यात येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance, Post office, Post office bank