मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Sapphire Foods IPO चा प्राईज बँड 1120-1180 रुपये निश्चित, वाचा IPO बद्दल महत्त्वाच्या गोष्टी

Sapphire Foods IPO चा प्राईज बँड 1120-1180 रुपये निश्चित, वाचा IPO बद्दल महत्त्वाच्या गोष्टी

KFC आणि पिझ्झा हट आऊटलेट्स चालवणाऱ्या Sapphire Foods कडे IPO मध्ये 1.75 कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर असेल. ज्या अंतर्गत कंपनीचे विद्यमान प्रमोटर्स आणि शेअर होल्डर्स त्यांचे स्टेक विकतील.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 2 नोव्हेंबर : Samara Capital कडून प्रमोडेट सॅफायर फूड्स इंडियाने (Sapphire Foods India) त्याच्या IPO ची किंमत 1120-1180 रुपये निश्चित केली आहे. यापूर्वी कंपनीने सांगितले होते की त्यांचा IPO 9 नोव्हेंबरला ओपन होईल आणि 11 नोव्हेंबरला बंद होईल. कंपनी 22 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजमध्ये लिस्ट होईल.

KFC आणि पिझ्झा हट आऊटलेट्स चालवणाऱ्या Sapphire Foods कडे IPO मध्ये 1.75 कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर असेल. ज्या अंतर्गत कंपनीचे विद्यमान प्रमोटर्स आणि शेअर होल्डर्स त्यांचे स्टेक विकतील. या ऑफर फॉर सेलमध्ये QSR मॅनेजमेंट ट्रस्ट 8.50 लाख शेअर्स विकणार आहे. तर Sapphire Foods Mauritius Ltd 55.75 लाख शेअर्स विकणार आहे. तर WWD Ruby Ltd 48.5 लाख शेअर्स विकणार आहे. ज्यामध्ये अॅमेथिस्ट प्रा. लिमिटेड 39.6 लाख शेअर्स विकणार आहे.

या ऑफर फॉर सेलमध्ये, AAJV इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट 80,169 शेअर्स विकणार आहे. तर एडलवाईस क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटीज फंड 16.2 लाख शेअर्स विकणार आहे. त्याच वेळी, एडलवाईस क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटीज फंड सिरीज II 6.46 लाख शेअर्स विकतील.

धनत्रयोदशीला खरेदी करताय सोनं? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, नुकसान टाळण्यासाठी ठरतील फायद्याच्या

कंपनी या IPO द्वारे 2,073.35 कोटी रुपये उभारणार आहे. सध्या सॅफायर फूड्स मॉरिशसकडे कंपनीत 46.53 टक्के, क्यूएसआर मॅनेजमेंट ट्रस्टकडे 5.96 टक्के, डब्ल्यूडब्ल्यूडी रुबीकडे 18.79 टक्के, अॅमेथिस्ट प्रा. लिमिटेडकडे 6.67 टक्के, एएजेव्ही इन्व्हेस्टमेंट ट्रस्टकडे 0.14 टक्के आणि एडलवाईस क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटीज फंडाचा 6.83 टक्के हिस्सा आहे.

याठिकाणी कारवर मिळेल 1 लाखांपर्यंतचे डिस्काउंट, 2 वर्षांसाठी सर्व्हिसिंग फ्री

Sapphire Foods भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये KFC, Pizza Hut आणि Taco Bell या नावाने 437 रेस्टॉरंट चालवते. वाढता मध्यमवर्गीय विभाग आणि बाहेरील खाणाऱ्यांचा ओघ यामुळे कंपनीला KFC आणि Pizza Hut द्वारेही चांगली संधी मिळणे अपेक्षित आहे. JM Financial, BofA Securities, ICICI Sucurities आणि IIFL Securities यांना इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.

First published:

Tags: Money, Share market