मराठी बातम्या /बातम्या /मनी /धनत्रयोदशीला खरेदी करताय सोनं? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, नुकसान टाळण्यासाठी ठरतील फायद्याच्या

धनत्रयोदशीला खरेदी करताय सोनं? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, नुकसान टाळण्यासाठी ठरतील फायद्याच्या

दिवाळीच्या काळात दरवर्षी सोने किंवा चांदीची मागणी वाढते कारण भारतीय या शुभ दिवशी दागिने किंवा नाण्यांच्या रूपात सोनं खरेदी करतात. या दिवशी सराफा दुकानांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही खास ऑफर किंवा सूट दिल्या जातात. तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा

दिवाळीच्या काळात दरवर्षी सोने किंवा चांदीची मागणी वाढते कारण भारतीय या शुभ दिवशी दागिने किंवा नाण्यांच्या रूपात सोनं खरेदी करतात. या दिवशी सराफा दुकानांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही खास ऑफर किंवा सूट दिल्या जातात. तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा

दिवाळीच्या काळात दरवर्षी सोने किंवा चांदीची मागणी वाढते कारण भारतीय या शुभ दिवशी दागिने किंवा नाण्यांच्या रूपात सोनं खरेदी करतात. या दिवशी सराफा दुकानांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही खास ऑफर किंवा सूट दिल्या जातात. तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा

पुढे वाचा ...

मुंबई, 02 नोव्हेंबर: दिपोत्सवाला (Diwali 2021) सुरुवात झाली आहे. यावर्षी धनतेरस (Dhanteras 2021) किंवा धनत्रयोदशी आज म्हणजेच 2 नोव्हेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. धनतेरस म्हणजे संपत्ती आणि समृद्धी. या दिवशी सोने, चांदी, भांडी खरेदी केली जाते. हा दिवस दिवाळीची सुरुवात आहे आणि सोने आणि इतर मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.

या काळात दरवर्षी सोने किंवा चांदीची मागणी वाढते कारण भारतीय या शुभ दिवशी दागिने किंवा नाण्यांच्या रूपात सोनं खरेदी करतात. या दिवशी सराफा दुकानांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही खास ऑफर किंवा सूट दिल्या जातात. जर तुम्ही या वर्षी सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पुढील 5 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून सोनेखरेदी तुमच्या फायद्याची ठरेल

1. सोन्याच्या किमतीचे निर्धारण

सोन्याची किंमत या धातूच्या शुद्धतेवर आधारित आहे. अर्थात सोन्याच्या गुणवत्तेनुसार त्यात बदल होतो.  24-कॅरेट सोने ही सर्वात शुद्ध गुणवत्ता आहे आणि म्हणून त्यासाठी सर्वात जास्त दर आकारला जातो. दागिने खरेदी करताना सोन्याची किंमत माहित करून घेणे आवश्यक आहे कारण बाजारातील दरानुसार दरदिवशी या किंमती बदलतात.

हे वाचा-याठिकाणी कारवर मिळेल 1 लाखांपर्यंतचे डिस्काउंट, 2 वर्षांसाठी सर्व्हिसिंग फ्री

2. नेहमी खरेदी करा हॉलमार्क असणारे दागिने

हॉलमार्क केलेले दागिने सोन्याच्या शुद्धतेची हमी देतात, म्हणून ते खरेदी करणे सुरक्षित मानले जाते. हॉलमार्किंग ही सोन्याची शुद्धता तपासण्याची प्रक्रिया आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही हॉलमार्क केलेले सोने प्रमाणित करणारी एजन्सी आहे.

3. शुद्धता किती आहे ते जाणून घ्या

सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये व्यक्त केली जाते, कारण 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध मानले जाते, तर 22 कॅरेट सोने 92% शुद्ध असते. सोने किंवा सोन्याचे कोणतेही दागिने खरेदी करताना नेहमी त्याची शुद्धता तपासा आणि त्यानुसार किंमत द्या.

हे वाचा-पेट्रोलच्या किंमतींनी बिघडवलं सामान्यांचं बजेट, आजही वधारले भाव

4. मेकिंग चार्जेस तपासा

मेकिंग चार्जेस म्हणजे  (Gold making charges) सोन्याच्या दागिन्यांवर आकारले जाणारे श्रम शुल्क, जे दागिन्यांचा प्रकार आणि डिझाइनवर अवलंबून असते. मानवनिर्मित दागिन्यांपेक्षा यंत्राने बनवलेले सोन्याचे दागिने स्वस्त आहेत कारण त्यात कमी श्रम असतात. अनेक दागिन्यांची दुकाने मेकिंग चार्जेसवर विशिष्ट सवलत देतात. दागिने खरेदी करण्यापूर्वी एखादी ऑफर किंवा मेकिंग शुल्क माफ आहे का हे तपासण्याचा सल्ला दिला जातो.

5. अचूक वजन तपासा

सोन्याचे दागिने वजनानुसार विकले जातात, हिरे किंवा इतर खडे या त्यांना आणखी वजनदार बनवतात. म्हणून, दागिन्यांच्या पूर्ण वजनासह सोन्याचे अचूक वजन तपासा. लक्षात ठेवा की तुम्ही कोणतेही किराणा सामान नाही कारण ती खूप मौल्यवान वस्तू खरेदी करत आहात, ज्याचे वजन खरेदीपूर्वी तपासणे आवश्यक आहे. वजन थोडेसेही कमी-जास्त झाल्यास समस्या निर्माण होऊ शकते.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price