• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • Diwali मध्ये मिळवा बंपर ऑफर! याठिकाणी कारवर मिळेल 1 लाखांपर्यंतचे डिस्काउंट, 2 वर्षांसाठी सर्व्हिसिंग फ्री

Diwali मध्ये मिळवा बंपर ऑफर! याठिकाणी कारवर मिळेल 1 लाखांपर्यंतचे डिस्काउंट, 2 वर्षांसाठी सर्व्हिसिंग फ्री

म्ही देखील गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ओला (Ola) तुम्हाला ही संधी देत आहे. भारतातील सर्वात मोठा मोबिलिटी प्लॅटफॉर्म Ola (OLA) ने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे.

 • Share this:
  मुंबई, 02 नोव्हेंबर: दिवाळीचा हंगाम (Diwali Season Shopping) म्हटलं की मोठी एखादी वस्तू घरी आणण्याची योजना आखली जाते. खासकरून गाडी घेण्यासाठी देखील या काळात अनेकांची लगबग असते. तुम्ही देखील गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ओला (Ola) तुम्हाला ही संधी देत आहे. भारतातील सर्वात मोठा मोबिलिटी प्लॅटफॉर्म Ola (OLA) ने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. ओलाने भारतातील सर्वात मोठा प्री-ओन्ड कार फेस्टिव्हल जाहीर (Ola Pre-Owned Car Festival) केला आहे. या अंतर्गत, ओला कार्स प्लॅटफॉर्मवर 2000 हून अधिक उत्कृष्ट डील आणि ऑफर दिल्या जात आहेत. ग्राहकांना या कार फेस्टिव्हलमध्ये (OLA car festival offer) मिळणारा फायदा म्हणजे, कंपनीच्या दाव्यानुसार तुम्ही कार खरेदी केल्यास 1 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. सवलतीसोबतच तुम्हाला 2 वर्षांसाठी सर्व्हिसिंग मोफत मिळेल. याशिवाय 12 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांची रिटर्न पॉलिसी अशाही ऑफर्सही दिल्या जात आहेत. हे वाचा-Diwali 2021: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी 'हा' चांगला पर्याय ठरेल प्री-ओन्ड कार म्हणजे काय? जुन्या गाड्या किंवा सेकंड हँड गाड्यांना प्री-ओन्ड कार म्हटले जाते. अर्थात अशा गाड्या ज्या याआधी एकदा खरेदी करण्यात आल्या आहेत. या गाड्यांची दुसऱ्यांदा विक्री होणार आहे. गेल्या काही काळापासून प्री-ओन्ड कार्सचे मार्केट तेजीमध्ये आहे. घरबसल्या मिळतील सुविधा ओलाच्या या स्कीमचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा लाभ ग्राहकांना घरबसल्या घेता येणार आहे. ओला कार्सचे सीईओ अरुण सरदेशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या दिवाळीत ओला कार्स अनेक उत्तम, रोमांचक आणि आकर्षक डील्स आणि ऑफर देत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना नवीन वाहन खरेदी करण्याच्या अनुभवापेक्षाही चांगला अनुभव देऊ. विशेष म्हणजे यासाठी त्यांना कुठेही जावे लागणार नाही, तर त्यांना घरबसल्या या सर्व सुविधा मिळणार आहेत.' हे वाचा-स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी चेअरमनना अटक, तुरुंगातच जाणार दिवाळी? खरेदी करा तुमच्या आवडीची गाडी ओला अॅपद्वारे ग्राहक नवीन आणि वापरलेली दोन्ही वाहने खरेदी करू शकतात. वाहन खरेदीपासून ते ग्राहकांना फायनान्स, रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स, मेंटेनन्स आणि कार सर्व्हिसिंग यांसारख्या सेवाही मिळतील. एवढेच नाही तर ग्राहक त्यांचे वाहन पुन्हा ओला कारला विकू शकतात. ज्या ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय कार खरेदी-विक्री करायची आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म वन स्टॉप शॉप ठरेल. कंपनीचे म्हणणे आहे की ओला कार्सने लाँचच्या पहिल्या महिन्यात 5,000 गाड्या विकल्या आहेत. ओला कार्स कंपनीने 300 सेंटरसह 100 शहरांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याची घोषणा केली आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: