Home /News /money /

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय गुंतवणूकदारांना फटका, आतापर्यंत युक्रेनच्या GDP पेक्षा जास्त नुकसान

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतीय गुंतवणूकदारांना फटका, आतापर्यंत युक्रेनच्या GDP पेक्षा जास्त नुकसान

15 फेब्रुवारी रोजी रशियाने मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केली. तेव्हापासून भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी रुपयांचे (197 बिलियन डॉलर) नुकसान झाले. हे नुकसान युक्रेनच्या 2021 च्या GDP च्या 181.03 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 मार्च : युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणु प्रकल्पावर रशियन हल्ल्यामुळे (Russia-Ukraine War) शुक्रवारी गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचा ( 66 बिलियन डॉलर) मोठा धक्का बसला. 15 फेब्रुवारी रोजी रशियाने मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केली. तेव्हापासून भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी रुपयांचे (197 बिलियन डॉलर) नुकसान झाले. हे नुकसान युक्रेनच्या 2021 च्या GDP च्या 181.03 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. मागील सेशनमधील 251 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत शुक्रवारी बीएसईचे बाजार भांडवल सुमारे 246 लाख कोटी रुपयांवर घसरल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. आजच्या 76 प्रति डॉलरच्या एक्सचेंज रेटच्या हिशेबाने 5 लाख कोटी रुपयांची घसरण आहे. Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरमध्ये 48 टक्क्यांची घसरण, तज्ज्ञांचं मत काय? कुणीही 15 फेब्रुवारीनंतरच्या या घटनांबद्दल विचार केला नसेल. तेव्हापासून, सेन्सेक्स जवळपास 4,000 अंक खाली आला आहे आणि गुंतवणूकदारांचे 197 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील नुकसानीच्या तुलनेत, ते 2021 च्या युक्रेनच्या GDP पेक्षा जास्त आहे. IMF च्या अंदाजानुसार युक्रेनचा 2021 GDP (Ukraine’s GDP) 181.03 बिलियन डॉलर होता. कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका 21 फेब्रुवारी रोजी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी लुहान्स्क आणि डोनेत्स्क (Luhansk and Donetsk) या दोन पूर्व युक्रेनियन प्रदेशांना स्वतंत्र राज्ये म्हणून मान्यता दिली आणि रशियन सैन्याला "शांतीरक्षक" म्हणून काम करण्याचे आदेश दिले. 23 फेब्रुवारी रोजी, युक्रेनने देशव्यापी आणीबाणी घोषित केली आणि दुसऱ्या दिवशी रशियाने युक्रेनवर पूर्णपणे युद्ध लादले. रशियावरील निर्बंध वाढतच गेले आणि तेलाच्या किमती वाढल्या. Share Market Update : शेअर बाजारात घसरण सुरुच, Sensex 768 अंकांनी तर Nifty 252 अंकांनी खाली शुक्रवारी, युक्रेन स्थित युरोपमधील सर्वात मोठ्या अणुभट्टीवर रशियन हल्ल्यात आग लागल्याचे वृत्त समोर आले. आग अणुभट्टीच्या बाहेर आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याची परवानगी रशियाकडून देण्यात आली होती. त्यांच्यावर गोळीबार करणार नसल्याचं आश्वासनही रशियाकडून देण्यात आले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Russia Ukraine, Share market

    पुढील बातम्या