मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Russia Ukraine Crisis: क्रूड ऑइलसह सोने, सोयाबीन, गहू आणि मक्याच्या किमतीतही तुफान वाढ

Russia Ukraine Crisis: क्रूड ऑइलसह सोने, सोयाबीन, गहू आणि मक्याच्या किमतीतही तुफान वाढ

रशिया गव्हाचा मोठा उत्पादक देश असून आता युद्धामुळे जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किमतीत (Wheat Rate) वाढ झाली आहे.

  नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : रशियाकडून युक्रेनविरोधात युद्धाची (Russia Ukraine Crisis War) घोषणा झाल्यानंतर क्रूड ऑइल (Crude Oil Rate) आणि सोने दर (Gold Rate) वधारला आहे. केवळ क्रूड ऑइल आणि सोने दरच नाही, तर गहू, सोयाबीन आणि मक्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रशिया गव्हाचा मोठा उत्पादक देश असून आता युद्धामुळे जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किमतीत (Wheat Rate) वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन आणि मका दरात मोठी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील हे युद्ध पुढे काय स्वरुप घेईल याची कोणालाच कल्पना नाही. गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदीकडे वळत आहेत. तसंच या परिस्थितीमुळे खाद्यपदार्थांचीही मागणी वाढली आहे. रशिया आणि युक्रेन जगातील मोठे गहू एक्सपोर्टर - मक्यानंतर जगभरात गहू सर्वाधिक शेती होणारा, जगातील सर्वात मोठं धान्य आहे. रशिया आणि युक्रेन या धान्याच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. रशिया 18 टक्क्यांहून अधिक गहू एक्सपोर्ट करतो. तर युक्रेन यात पाचव्या स्थानावर आहे. केवळ हे दोन देश जगभरात 25.4 टक्के गव्हाची निर्यात करतात. 2019 मध्ये रशियाने एकूण 60.64 हजार कोटी रुपयांचा गहू जगभरात निर्यात केला होता. तर युक्रेनने 2019 मध्ये 23.16 हजार कोटी रुपयांचा गहू इतर देशात एक्सपोर्ट केला होता.

  हे वाचा - युक्रेनवर हल्ला होताच टेन्शन वाढलं, भारतात 20 हजार कुटुंब भीतीच्या सावटाखाली

  युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम अनेक वस्तूंवर झाला आहे. रबराची किंमतही 38 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे. तसंच सोयाबीन दरातही मोठी वाढ झाली असून दीड वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर ट्रेड करत आहेत. गव्हाच्या दरातही मोठी वाढ झाली असून मागील 9 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर गव्हाची विक्री होत आहे. मक्याच्या किमतीतही वाढ झाली असून हा दर 33 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

  हे वाचा - रिपोर्टिंग दरम्यान आला रशियाच्या Fighter Jet चा भयंकर आवाज, पाहा LIVE VIDEO

  सोने दरात वाढ - सोन्याची झळाळी चांगलीच वाढली आहे. MCX वर सोनं 2.15 टक्क्यांच्या वाढीसह 51750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. आजच्या दिवसात सोने दरात 1300 रुपयांची वाढ झाली आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold price, Russia Ukraine

  पुढील बातम्या