नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी: युक्रेन-रशिया (Ukraine-Russia) वाद आणखी चिघळल्यानंतर भारत सरकारनं (Indian government) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी एअर इंडियाचे विमान AI1946 ने कीव येथून उड्डाण केलं. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान रात्री 11.45 च्या सुमारास दिल्लीला पोहोचलं. या विमानातून युक्रेनमध्ये राहणाऱ्या 242 भारतीयांना आणण्यात आलं. एअर इंडियाच्या विमानाने (Air India flight) भारतात पोहोचलेल्या लोकांचे स्वागत करण्यासाठी त्यांचे नातेवाईक आधीच विमानतळावर पोहोचले होते.
एअर इंडियाचे युक्रेनला जाणारं पहिलं विमान आज सकाळी 7.30 वाजता उड्डाण केलं. यामध्ये 242 लोकांना पूर्ण क्षमतेनं आणण्यात आले. एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमानातून भारतीय लोकांना युक्रेनमधून आणण्यात आलं.
24 आणि 26 फेब्रुवारीलाही युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाची विमाने उड्डाण करणार आहेत. एअर इंडियानं यापूर्वी कधीही युक्रेनला उड्डाण केलं नव्हतं, मात्र संकटात सापडलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी सरकारनं एअर इंडियाची उड्डाणं तेथे जाऊन भारतीय नागरिकांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
A special flight from Ukraine comprising Indian nationals including students lands in Delhi. Visuals from IGI Airport. #UkraineRussiaCrisis
Russia President Vladimir Putin this morning declared a 'military operation' in Ukraine. pic.twitter.com/Kl8PFGAD8v — ANI (@ANI) February 24, 2022
एअर इंडियानं सांगितलं की, पुढील आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 256 बोईंग 787 ड्रीमलाइनर उड्डाण भारतातून युक्रेनला पाठवली जातील. युक्रेनमधून भारतात येणारे नागरिक एअर इंडियाचे बुकिंग ऑफिस, वेबसाइट, कॉल सेंटर आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सद्वारे बुकिंग सुरू करू शकतात.
युक्रेनमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी
दरम्यान दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून भारतात परतणारे विमान महागले. मेडिकलच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. युक्रेनमध्ये असलेल्या बिहारी विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी परतायचे आहे पण आता विमान तिकिटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ज्यांना तिकीट मिळत आहे त्यांनाही जास्त किंमत मोजावी लागत आहे. विद्यार्थीही अनेक एजंटांच्या संपर्कात आहेत. इकडे मीडियामध्ये युद्धाच्या बातम्या येत असल्यानं कुटुंबातील तणाव प्रत्येक क्षणी वाढत आहे.
#WATCH यूक्रेन से करीब 242 यात्रियों को लेकर एयर इंडिया की विशेष फ्लाइट दिल्ली हवाई अड्डे पहुंची। pic.twitter.com/XktIbH91E4
— ANI_HindiNews (@AHindinews) February 22, 2022
युक्रेनमध्ये सुमारे 20,000 भारतीय नागरिक आहेत. भारत सरकारनं सर्व नागरिकांना लवकरात लवकर भारतात परतण्याचे आवाहन केलं आहे. आलेल्या 242 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी मेडिकल शिकण्यासाठी युक्रेनला गेले आहेत. युक्रेनमधून मायदेशी परतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना भारतात नवीन आयुष्य मिळाल्याचं वाटलं.
"The situation is normal (in Ukraine). We followed Embassy advisory. Online classes may continue," said Riya, a student who arrived in Delhi from Ukraine pic.twitter.com/UReiXOzE0L
— ANI (@ANI) February 23, 2022
युक्रेनमध्ये गेल्या 2 वर्षांपासून मेडिकलचे शिक्षण घेत असलेली तन्वी सांगते की, आगामी काळात युक्रेनमधील परिस्थिती खूपच वाईट होणार आहे. तन्वी पश्चिम युक्रेनमध्ये राहत होती. पश्चिम युक्रेनमधील परिस्थिती पूर्व युक्रेनसारखी वाईट नाही. ती म्हणते की, रशियाचे सैन्य जवळपास सर्व सीमेवर तैनात आहे. सीमेवर मोठ्या प्रमाणात रशियन शस्त्रे आणि युद्ध रणगाडे ठेवण्यात आले आहेत.
रात्री ऐकू यायचा गोळीबाराचा आवाज
दिल्लीहून मेडिकल शिकण्यासाठी गेलेली 20 वर्षीय साक्षी सांगते की, तिथली परिस्थिती अजिबात सामान्य नाही. तिला रात्री गोळीबाराचा आवाज येत असे, जे ऐकून ती घाबरायची. युक्रेनमध्ये सर्वत्र पोलीस गस्त घालत असल्याचं ती सांगते. दिवस-रात्र पोलिसांची गस्त सुरू आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचं तिनं सांगितलं. भारतात आल्यावर त्यांना खूप सुरक्षित वाटत आहे आणि आता त्यांना दुसरं आयुष्य मिळाल्याचं त्यांना वाटतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President Vladimir Putin, Russia, Russia Ukraine, Ukraine news