मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

रिपोर्टिंग करताना रिपोर्टरच्या मागे आला रशियाच्या Fighter Jet चा भयंकर आवाज, पाहा LIVE VIDEO

रिपोर्टिंग करताना रिपोर्टरच्या मागे आला रशियाच्या Fighter Jet चा भयंकर आवाज, पाहा LIVE VIDEO

वृत्तांकन करत असताना या वार्ताहरानं सांगितलं की पाचवेळा त्यांनी स्फोटांचे आवाज ऐकले. त्यानंतर ते काही क्षण थांबले कारण प्रचंड मोठा आवाज येत होता. हा आवाज लढाऊ विमानाच्या आवाजासारखा असल्याचं त्यानं सांगितलं.

वृत्तांकन करत असताना या वार्ताहरानं सांगितलं की पाचवेळा त्यांनी स्फोटांचे आवाज ऐकले. त्यानंतर ते काही क्षण थांबले कारण प्रचंड मोठा आवाज येत होता. हा आवाज लढाऊ विमानाच्या आवाजासारखा असल्याचं त्यानं सांगितलं.

वृत्तांकन करत असताना या वार्ताहरानं सांगितलं की पाचवेळा त्यांनी स्फोटांचे आवाज ऐकले. त्यानंतर ते काही क्षण थांबले कारण प्रचंड मोठा आवाज येत होता. हा आवाज लढाऊ विमानाच्या आवाजासारखा असल्याचं त्यानं सांगितलं.

कीव, 24 फेब्रुवारी: अखेर जगाला ज्याची भीती होती, तेच घडलं आहे. रशियाचे राष्ट्रापती व्लादिमीर पुतीन (Russian Prsident Vladimir Putin) यांनी युक्रेनवर (Ukraine) लष्करी कारवाई (Military Operation) सुरू केल्याची घोषणा केली असून, रशियन सैन्यानं युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास, पुतीन यांनी आपण युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा केली आणि काही वेळातच युक्रेनची राजधानी कीव (Kyiv) आणि इतर अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. युक्रेनमधील दोन फुटिरतावादी प्रांतांच्या बंडखोर नेत्यांनी रशियाकडे लष्करी मदत मागितल्याचे निवेदनही क्रेमलिननं जारी केलं होतं. त्यानंतर पुतीन यांनी एक निवदेन जारी करत पश्चिम युक्रेननं मागितलेल्या मदतीनुसार आपण ही मदत करत असून, युक्रेनच्या सैनिकांनी शस्त्र खाली ठेवावीत असं आवाहन केलं आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वोल्डोमीर झेलेन्क्सी (Volodymyr Zelensky) यांनी, रशियन जनतेनं सगळ्या युरोप खंडाला महायुद्धाच्या दरीत लोटणाऱ्या या रशियन सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देऊ नये असं आवाहन केलं आहे. त्यांनी पुतीन यांना दूरध्वनी करून याबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र क्रेमलिनकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाहीच उलट युक्रेनच्या सीमेवर रशियानं तब्बल 2 लाख सैनिकांची फौज उतरवली असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक जागतिक नेत्यांनीही पुतीन यांच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. हे वाचा-युक्रेन सैन्यांच्या शस्त्रांनी भरलेल्या गोदामात Blast, एयरस्पेस ही केलं बंद रशियन फौजा केवळ पुतीन यांचा आदेश येण्याच्या प्रतीक्षेतच होत्या असं त्यांनी त्वरेनं केलेल्या हल्ल्यांवरून स्पष्ट होतं. पुतीन यांनी घोषणा करताच अगदी अल्पावधीतच रशियाच्या लढाऊ विमानांनी राजधानी कीवसह अनेक प्रमुख शहरांवर बॉम्बहल्ले केले. थेट वृत्तांकन (लाईव्ह टेलिकास्ट) करणार्‍या सीबीएस वाहिनीच्या वार्ताहराच्या प्रक्षेपणादरम्यान ऐकू आलेल्या बॉम्बस्फोटांच्या आणि विमानांच्या आवाजामुळे हे सर्वांना दिसून आलं. वृत्तांकन करत असताना या वार्ताहरानं सांगितलं की पाचवेळा त्यांनी स्फोटांचे आवाज ऐकले. त्यानंतर ते काही क्षण थांबले कारण प्रचंड मोठा आवाज येत होता. हा आवाज लढाऊ विमानाच्या आवाजासारखा असल्याचं त्यानं सांगितलं. ट्विटरवरदेखील अनेकांनी युक्रेनच्या विविध शहरांमधील स्फोटांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. मारियुपोल शहरातील एका व्हिडीओमध्ये तर स्फोटांचे प्रचंड आवाज ऐकू येत आहेत. रशियाच्या या हल्ल्याचा निषेध करताना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (US President Joe Biden) म्हणाले की, पुतीन यांनी एक पूर्वनियोजित युद्ध घडवले आहे. यामुळे प्रचंड प्राणहानी आणि नुकसान होणार आहे. या हल्ल्यामुळे होणार्‍या मृत्यू आणि विनाशासाठी केवळ रशियाच जबाबदार असेल. अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र एकत्रित आणि निर्णायक मार्गाने याला प्रत्युत्तर देतील. सगळं जग या विनाशासाठी रशियालाच जबाबदार धरेल.' हे वाचा-लष्कर आणि शस्त्रास्त्रांच्या बाबतीत रशिया आणि युक्रेनमध्ये कोणाकडे किती सामर्थ्य 'रशियन सैन्याने केलेल्या अनावश्यक आणि अन्यायकारक हल्ल्याचा सामना करणार्‍या युक्रेनियन लोकांसाठी सगळं जग प्रार्थना करत आहे, असंही बायडन म्हणाले. नाटोचे (NATO) प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की, 'रशियाच्या कारवाईमुळे असंख्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. आम्ही वारंवार इशारा देऊनही आणि चर्चेचे अथक प्रयत्न करत असूनही, रशियाने एका सार्वभौम आणि स्वतंत्र देशाविरूद्ध आक्रमणाचा मार्ग निवडला आहे.'
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Russia's Putin

पुढील बातम्या