नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : कोरोना काळात देशातील बँकिंग फसवणूकीच्या (Banking Fraud) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच एक मोठं कारण म्हणजे यादरम्यान इंटरनेटचा वाढता वापर. याचाच फायदा सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी करुन घेत आहेत. आता गृहमंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या सायबर दोस्त या ट्वीटर (Twitter) अकाऊंटवरुन लोकांना कोरोनाच्या नावानं केल्या जाणाऱ्या फसवणुकीबद्दल सावध केलं गेलं आहे. मंत्रालयानं लोकांना इशारा दिला आहे, की कोणत्याही प्रकारची चूक करू नका. सोबतच तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. याप्रकरणाची प्रकरणं मागील काही वर्षात समोर येत आहेत. याच कारणामुळे सरकार आणि बँकांनी लोकांना याबद्दल जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, तरीही हे गुन्हे बंद झालेले नाही. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर करत आहेत.
सावधान रहें, साइबर अपराधी कोविड-19 का हवाला देकर चमत्कारी इलाज, हर्बल उपचार, टीके, त्वरित जांच आदि जैसी आकर्षक पेशकश करके ग्राहकों को लुभा सकते हैं। चिकित्सा परामर्श देने एवं तत्काल भुगतान करने का आग्रह करने वाले संदिग्ध /अवांछित कॉल, ई-मेल अथवा टैक्स्ट का जबाव न दें।
— Cyber Dost (@Cyberdost) February 25, 2021
तुम्ही संबंधित लिंकवर क्लिक केल्यास हॅकर तुमची संपूर्ण माहिती चोरु शकतात. त्यामुळे, अशा लिंकवर कधीच क्लिक करू नका. लोक काहीही विचार न करता या लिंकवर क्लिक करतात आणि त्यांची संपूर्ण माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. गृहमंत्रालयाद्वारे सायबर दोस्त या हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये या मेसेजचं स्वरुपही दाखवलं गेलं आहे. तुम्हाला असा मेसेज येत असेल तर लगेचच सायबर क्राईम पोलिसांकडे याबद्दलची तक्रार करा. सोबतच मेसेजमध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. सरकारकडून वेळोवेळी फेक मेसजबद्दलचा अलर्ट जारी केला जातो. तसंच या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कधीच अनोळखी नंबरवरुन आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि हे मेसेज फॉरवर्डही करू नका.