Home /News /money /

QR Code scam: कोणत्याही बँकेत खातं असेल तर वेळीच व्हा सावध! SBI चा महत्त्वाचा इशारा

QR Code scam: कोणत्याही बँकेत खातं असेल तर वेळीच व्हा सावध! SBI चा महत्त्वाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी क्युआर कोडचा (QR Code scam) वापर करण्यास सुरुवात केली आहे. क्युआर कोड स्कॅन केल्यावर लॉटरी किंवा बक्षीस मिळेल असं आमिष दाखवून ही फसवणूक केली जाते.

मुंबई, 25 मार्च: वेगानं डिजिटायझेशन (Digitization) झाल्यामुळे आजकाल ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) घटनांमध्येही वाढ झाली आहे. यासाठी गुन्हेगार विविध प्रकारच्या क्लृप्त्या लढवतात. काही वेळा एसएमएसद्वारे (Fake SMS) तर काही वेळा बँकेच्या नावाचा वापर करून कॉलच्या माध्यमातून खातेदाराचे (Account Holders) पिन कोड मिळवले जातात. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी क्युआर कोडचा (QR Code scam) वापर करण्यास सुरुवात केली आहे. क्युआर कोड स्कॅन केल्यावर लॉटरी किंवा बक्षीस मिळेल असं आमिष दाखवून ही फसवणूक केली जाते. क्युआर कोड स्कॅमच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं (SBI Alert) देशातील सर्व बँक खातेदारांना सावध केलं आहे. गुरुवारी (24 मार्च 2022) एसबीआयनं या संदर्भात ट्वीट केलं आहेत. एसबीआयनं 'आझादी का अमृत महोत्सवा'अंतर्गत (SBI Azadi Ka Amrit Mahotsav) नागरिकांना बँकिंग क्षेत्राशी निगडित गोष्टींमध्ये शिक्षित करण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत एसबीआयनं गुरुवारी एक ट्वीट केलं आहे. 'क्यूआर कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा? # हा राँग नंबर आहे (#YehWrongNumberHai). क्युआर कोड स्कॅमपासून सावध रहा. स्कॅन करण्यापूर्वी विचार करा, अज्ञात आणि अनव्हेरिफाईड क्युआर कोड स्कॅन करू नका. स्टे अलर्ट अँड स्टे #सेफ विथ एसबीआय (#SafeWithSBI)', असं हे ट्वीट आहे. हे वाचा-Multibagger stock: 27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई या ट्वीटसोबत एसबीआयनं एक छोटा इन्फोग्राफिक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करण्याची प्रक्रिया दाखवणाऱ्या या व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना अलर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'कुठलाही अज्ञात क्युआर कोड स्कॅन करण्यापूर्वी आपण कुठल्या स्कॅमचा बळी तर ठरत नाही ना? याचा विचार केला पाहिजे. कधीही अज्ञात क्युआर कोड स्कॅन करू नका किंवा अज्ञात ठिकाणी यूपीआय पिनही टाकू नका,' असं या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. ट्वीट आणि इन्फोग्राफिक व्हिडीओदेखील पोस्ट करण्यापूर्वी म्हणजे बुधवारीदेखील एसबीआयनं एक पोस्ट केली होती. या पोस्टमधून ग्राहकांना आर्थिक फसवणुकीच्या पद्धतींची माहिती आणि त्यापासून वाचण्याचे मार्ग सांगण्यात आले होते. एसबीआयच्या दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'तुमची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. cybercrime.gov.in वर सायबर गुन्ह्यांची तक्रार करा. फोन, मेसेज किंवा ईमेलद्वारे केवायसी अपडेट्ससाठी मिळणाऱ्या फसवणुकीच्या ऑफरबद्दल सावध रहा. स्ट्राँग पासवर्डचा वापर करा आणि ते नियमितपणे बदलत रहा. कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.' फसवणुकीच्या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी बँकेनं काही उपाय सांगितले आहेत. आपली वैयक्तिक किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती कधीही शेअर करू नका. सहज अंदाज लावता येईल असे सोपे पासवर्ड ठेवू नका. एटीएम कार्ड नंबर, पिन, यूपीआय पिन, इंटरनेट बँकिंग इत्यादींशी संबंधित माहिती गुन्हेगारांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी लिहू नका. सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका. कुठल्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा अशी अ‍ॅप्स डाउनलोड करू नका. अशा काही सूचना एसबीआयनं बँक ग्राहकांना दिल्या आहेत. हे वाचा-CSK ICICI Bank Credit Card: चेन्नईच्या सामन्यांसाठी मिळेल कॉम्प्लिमेंट्री तिकीट, आणखी बरंच काही; चेक करा फीचर्स पंतप्रघान जन-धन योजना (PM Jan Dhan Yojana) लागू झाल्यानंतर, भारतातील फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. जे नागरिक आतापर्यंत बँकिंग सेवेपासून (Banking Services) वंचित होते त्यांच्यासाठी बँक खाती उघडण्यात आली आहेत. ही योजना सुरू झाल्यानंतर केवळ चार वर्षांतच देशातील 80 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येची बँक खाती तयार झाली. याशिवाय, नोटबंदी (Demonetisation) आणि कोरोना (Corona Pandemic) महामारीमुळे डिजिटायझेशनलाही (Digitalization) वेग आला. या पार्श्वभूमीवर बँक फ्रॉडच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली. म्हणून एसबीआयनं देशातील नागरिकांना बँक व्यवहारांबाबत शिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.
First published:

Tags: Financial fraud, Online fraud, SBI, Sbi alert, SBI bank, SBI Bank News, Scam

पुढील बातम्या